घरोघरी जात देवीची गाणी म्हणणारी नेहा आज गडगंज श्रीमंत; पाहा कसं मिळवलं इकतं यश

पैसे कमवण्यासाठी या बहिणींच्या जोडीनं या मार्गाचा बरीच वर्षे वापर केला.

Updated: Jun 6, 2022, 10:22 AM IST
घरोघरी जात देवीची गाणी म्हणणारी नेहा आज गडगंज श्रीमंत; पाहा कसं मिळवलं इकतं यश  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : आपल्या कलेच्या बळावर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या नेहा कक्करडे पाहिलं, की लक्षात येतं पाहता पाहता तिच्या प्रसिद्धीचा व्यास चांगलाच मोठा होत आहे. प्रचंड मेहनत करत नेहा आज या टप्प्यावर पोहोचली. पण, तिचा आतापर्यंतचा प्रवास फारसा सोपा नव्हता.  (Neha Kakkar Birthday) 

घरोघरी किंवा विविध भागांमध्ये जात नेहा तिच्या बहिणीसोबत म्हणजे सोनू कक्कर हिच्यासोबत जगरात्यांमध्ये गात होती. पैसे कमवण्यासाठी या बहिणींच्या जोडीनं या मार्गाचा बरीच वर्षे वापर केला. (singer Neha Kakkar net worth Birthday)

नेहाच्या नशीबाला तेव्हाच कलाटणी मिळाली, जेव्हा ती एका सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली. नेहा इथं यशस्वी नाही ठरली, पण तिला यशाच्या अनेक वाटा मात्र दिसल्या. 

पाहता पाहता नेहानं योग्य गोष्टींची निवड करत आपली वाट चालण्यास सुरुवात केली. आजच्या घडीला ती एका गाण्यासाठी तब्बल कोट्यवधी रुपयांचं मानधनही घेते. 

हल्लीच्या दिवसांमध्ये बहुतांश चित्रपटांमध्ये नेहाची गाणी असतात. रिअॅलिटी शोम्ये परीक्षक म्हणूनही ती सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नेहाची वार्षिक कमाई तब्बल 33 कोटी रुपये इतकी आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार ती एका गाण्यासाठी कमीत कमी 25 लाख रुपये आकारते. प्लेबँक सिंगिंगव्यतिरिक्त नेहा स्टेज शोच्या माध्यमातूनही चांगलीच कमाई करते. 

सोशल मीडियावरही नेहाच्या फॉलोअर्सची संख्या कमी नाही. स्टाईल स्टेटमेंटपासून फॅमिली गोल्सपर्यंत प्रत्येक बाबतीत नेहा अग्रेसर असल्याचं पाहायला मिळतं.