चर्चा तर होणारच... इब्राहिम अली खान करतोय अर्जुन रामपालच्या मुलीला डेट?

सोशल मीडियावरील स्टार किड्सचे फोटो लोकांना खूप चर्चेची संधी देतात.

Updated: Jul 17, 2022, 09:36 PM IST
चर्चा तर होणारच...  इब्राहिम अली खान करतोय अर्जुन रामपालच्या मुलीला डेट? title=

मुंबई : सोशल मीडियावरील स्टार किड्सचे फोटो लोकांना खूप चर्चेची संधी देतात. सध्या चर्चा सुरुये ती म्हणजे सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम आणि अर्जुन रामपालची मुलगी माहिका रामपालची. सैफच्या मुलाने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेल्या ताज्या फोटोंनंतर सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केला जात आहे की तो अर्जुन रामपालची मुलगी माहिकाला डेट करतेय का? हा फोटो लंडनमधील एका क्लबमधला आहे. ज्यामध्ये इब्राहिम आणि माहिका मिंत्रासोबत आहेत. सैफने हा फोटो त्याच्या अकाऊंटवर पोस्ट करताच लोकांनी त्यावर कमेंट करायला सुरुवात केली आहे.

इब्राहिम नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असतो
हा फोटो फारसा स्पष्ट नसला तरी यामध्ये इब्राहिम त्याचा मित्र ओहराम अवतरामन आणि माहिकासोबत दिसत आहे. इब्राहिम आणि माहिका दोघंही काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आहेत तर त्याचा मित्र पिवळ्या शर्टमध्ये दिसत आहे. या फोटोत माहिका गोड स्माईल देताना दिसत आहे. इब्राहिम गेल्या काही वर्षांत सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो.  आणि हळूहळू तो हेडलाइनमध्ये आहे. काही काळापूर्वी टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीसोबतच्या त्याच्या अफेअरच्या बातम्या मीडियात आल्या होत्या.

इब्राहिम आणि पलक काही दिवसांपुर्वी मुंबईतील रेस्टॉरंटमध्ये एकत्र दिसले होते. दुसरीकडे, महिका बहुतेकदा चित्रपटाच्या वातावरणापासून दूर राहते. मात्र सोशल मीडियावर तिचे खूप चाहते आहेत. अलीकडेच ती अजय देवगण-काजोलची मुलगी न्यासासोबत लंडनमध्ये पार्टी करताना दिसली. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

इब्राहिम बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याच्या तयारीत आहे. मात्र त्याआधी तो फिल्मी वातावरणाशी जुळवून घेण्याचं प्रशिक्षण घेत आहे. रणवीर सिंग-आलिया भट्ट स्टारर करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात तो सहाय्यक दिग्दर्शक आहे. रॉकी और रानी की प्रेमकहानीबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे की, या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता 2023 मध्ये व्हॅलेंटाइनच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीच्या बातमीनंतर आलेल्या या अपडेटमध्ये करण जोहरला काही सीन पुन्हा शूट करायचे आहेत. असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.