मुंबई : नुकताच बँकॉकमध्ये 19 वा आयफा अवॉर्ड आयोजित करण्यात आलं. 3 दिवस चाललेल्या या अवॉर्ड फंक्शनमध्ये अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. यामध्ये रेखाने देखील तब्बल 20 वर्षानंतर परफॉर्म केलं आहे. आयफा 2018 मध्ये उत्कृष्ठ अभिनेत्री म्हणून श्रीदेवीला सन्मानित करण्यात आलं आहे. मॉम या सिनेमाकरता हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी हा पुरस्कार घेण्यासाठी बोनी कपूर स्टेजवर पोहोचले. मात्र अवॉर्ड स्विकारताना बोनी कपूर भरपूर भावूक झाले.
श्रीदेवीच्या आठवणीने बोनी कपूर भावूक झाले असून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्याचवेळी लगेच अर्जून कपूर आणि अनिल कपूर धावत स्टेजवर आले. आणि या दोघांनी बोनी कपूरला दिलासा दिला. या अगोदर श्री देवीला 'मॉम' या सिनेमाकरता नॅशनल अवॉर्ड देखील मिळाला आहे.
She was the queen of grace and worthy of every praise. There's no doubt the award for Performance in a Leading Role - Female posthumously goes to the late #Sridevi#IIFA2018 #NEXAIIFAAwards pic.twitter.com/x88ClJgR1d
— IIFA Awards (@IIFA) June 24, 2018
नॅशनल अवॉर्ड घेण्यासाठी बोनी कपूर आणि त्यांच्या दोन्ही मुली पोहोचल्या होत्या. श्रीदेवी यांचे निधन 24 फेब्रुवारी रोजी निधन झालं. श्रीदेवी आपला भाचा मोहित मारवाह याच्या लग्नाकरता दुबईत गेली होती. त्यावेळी बाथटबमध्ये बुडून तिचा मृत्यू झाला.