मुंबई : बॉलीवूडमध्ये नव्या जनरेशनच्या पॉवरपॅक्ड अॅक्टर्सपैकी एक टायगर श्रॉफच्या नावाची चर्चा सध्या सुरु आहे. मार्चच्या अखेरच्या आठवड्यात रिलीज झालेल्या टायगर श्रॉफच्या 'बागी २' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतेय. मिळालेल्या वृत्तानुसार फिल्मने रिलीज झाल्यानंतर ७व्या दिवशी १०० कोटी रुपयांची कमाई केली.
रिलीजच्या पहिल्या दिवशी २५ कोटी कमाई करणाऱ्या या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतोय. या सिनेमाने दीपिका पदुकोणच्या पद्मावत या सिनेमाच्या फर्स्ट डे कलेक्शनचा रेकॉर्ड मोडला. टायगरचा हा सिनेमा या वर्षातील दुसरा सर्वाधिक वीकेंड ओपनर ठरलाय.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शने या सिनेमाच्या कमाईचा आकडा ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलाय. ३० मार्चला रिलीज झालेल्या बागी २ने सातव्या दिवशी एकूण १०४.९० कोटी रुपयांची कमाई केली. यासाठी निर्माता करण जोहरने टायगर श्रॉफला ट्विटरवरुन अभिनंदन केले. टायगर श्रॉफची अॅक्शन आणि दिशा पटानीसोबतची त्याची केमिस्ट्री लोकांना पसंत पडतेय.
And #Baaghi2 hits a century... cr and counting... Third film to cross ₹ 100 cr mark in 2018, after #Padmaavat and #SKTKS... Fri 25.10 cr, Sat 20.40 cr, Sun 27.60 cr, Mon 12.10 cr, Tue 10.60 cr, Wed 9.10 cr. Total: ₹ 104.90 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) April 5, 2018
या सिनेमा टायगर हा रणवीर प्रताप सिंग उर्फ रॉनीच्या भूमिकेत आहे. तो एक कमांडोची भूमिका निभावतोय. तर नेहा(दिशा पटानी) त्याची कॉलेजची लव्हर तिचे दुसऱ्या मुलाशी लग्न होते. चार वर्षानंतर नेहा आणि रॉनीची भेट होते. नेहा रॉनीकडून तिच्या किडनॅप झालेल्या मुलीला शोधण्यासाठी मदत मागते आणि येथूनच कहाणी बदलते.