नवी दिल्ली : बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता अजय देवगन याच्या 'बादशाहो' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाने ६ दिवसात एकूण ६० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. यावरून चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला असल्याचं दिसून येत आहे. दुसऱ्या आठवड्यात देखील प्रेक्षक चित्रपटगृहाकडे वळले.
बॉक्स ऑफिसवर हिट ठरणारा गेल्या तीन वर्षातील अजयचा हा पहिला चित्रपट आहे. बॉलिवूडचे ट्रेंड अनॅलिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करून सांगितले की, 'बादशाहो' या चित्रपटाने ६ दिवसात एकूण ६०.५४ कोटींचा गल्ला केला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी १२.६० कोटी, दुसऱ्या दिवशी १५.६० कोटी तर तिसऱ्या दिवशी १५.१० कोटी कमावले. चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या दिवशी अनुक्रमे ६.८२, ६.१२ आणि ४.३० कोटींचा गल्ला केला.
#Baadshaho Fri 12.60 cr, Sat 15.60 cr, Sun 15.10 cr, Mon 6.82 cr, Tue 6.12 cr, Wed 4.30 cr. Total: ₹ 60.54 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) September 7, 2017
'बादशाहो' चित्रपटात अजय देवगन, इम्रान हाश्मी, विद्युत जामवाल, इलियाना डीक्रूज, ईशा गुप्ता आणि संजय मिश्रा मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १९७५ साली इंदिरा गांधी आणि महारानी गायत्री देवी यांच्यात झालेल्या युद्धाविषयी आहे.