'Dharamveer' सिनेमाचा विक्रम पाहून प्रेक्षकही थक्क

नव्या पिढीने 'धर्मवीर' पहिला...  पहिल्याचं दिवशी दणदणीत विक्रम रचला, प्रेक्षकही झाले थक्क   

Updated: May 17, 2022, 10:59 AM IST
'Dharamveer' सिनेमाचा विक्रम पाहून प्रेक्षकही थक्क title=

मुंबई : मराठी मनावर काही दशकं राज्य करणाऱ्या बड्या लोकनेत्याचा जीवनपट मोठ्या पडद्यावर आला आणि नव्या पिढीला आनंद दिघे कळाले.  कट्टर शिवसैनिक काय असतो, हे सांगण्यासाठी आधी आनंद दिघे व्हावं लागतं असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.  शिवसेनेचं एक पर्व गाजवणारे आणि ठाणेकरांसाठी विशेष जीव ओतणारा नेता म्हणून आनंद दिघे यांच्याकडे सातत्यानं पाहिलं गेलं.  13 मे रोजी दिघे साहेबांचा जीवनपट पडद्यावर आला आणि पहिल्याचं दिवशी सिनेमाने दणदणीत विक्रम रचला. 

पहिल्याच दिवशी 'धर्मवीर' सिनेमाने जवळपास 2.05 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. पण आणखी मोठा टप्पा अद्याप सिनेमाला गाठायचा आहे. महत्त्वाचं म्हणजे शनिवार, रविवार असल्यामुळे सिनेमा किती मजल मारेल हे पाहाण महत्त्वाचं ठरणार आहे. 

आनंद दिघे यांच्या राजकीय कारकिर्दीत नेमक्या कोणत्या घडामोडी घडल्या आणि त्या प्रत्येक प्रसंगाला ते कसे सामोरे गेले हे सर्वच या चित्रपटातून साकारण्यात आलं आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अभिनेता प्रसाद ओक यानं मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. 

प्रसादने साकारलेले आनंद दिघे पाहताना त्यानं या व्यक्तीरेखेसाठी घेतलेली मेहनत लगेचच लक्षात येत आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणं, हिंदूच्या पाठी ठाम उभं राहाणं, महिलांना सुरक्षितता देणं, सामाजिक तंटे सोडवणं, ठाण्याचा विकास करणं अशी अनेक कामं दिघेसाहेबांनी केली आहेत.