close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सलग तिसऱ्या दिवशी 'सिम्बा-द लायन किंग' चित्रपटाची दमदार कमाई

एव्हेंजर्स चित्रपटाच्या सीरीजला टक्कर देत 'सिम्बा-द लायन किंग' चित्रपटने कमाईच्या यादीत टॉप ३ मध्ये नाव कमावले आहे.

Updated: Jul 22, 2019, 04:12 PM IST
सलग तिसऱ्या दिवशी 'सिम्बा-द लायन किंग' चित्रपटाची दमदार कमाई

मुंबई : 'सिम्बा-द लायन किंग'  चित्रपट १९ जुलै रोजी रूपेरी पडद्यावर धडकला. चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जवळपास ११ कोटींपर्यंत मजल मारली आहे. चित्रपटाने सलग तिसऱ्या दिवशी ५० कोटी रूपयांचा गल्ला जमवला आहे. अॅनिमेशच्या जगात साकारण्यात येणाऱ्या या चित्रपटाला आवाज खुद्द किंग खान अभिनेता शाहरूख खान आणि मुलगा आर्यन खान यांनी दिला आहे. मुफासा या व्यक्तीरेखेला शाहरूखने आवाज दिला आहे, तर सिम्बा या व्यक्तीरेखेला आर्यनने आवाज दिला आहे.

एव्हेंजर्स चित्रपटाच्या सीरीजला टक्कर देत 'सिम्बा-द लायन किंग' चित्रपटने कमाईच्या यादीत टॉप ३ मध्ये नाव कमावले आहे. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहे. चित्रपट ५ कोटींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तण्यात येत आहे. चाहत्यांकडून मिळत असलेल्या प्रेमाचे आभार शाहरूखने ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. 

'सिम्बा-द लायन किंग' चित्रपट भारतात एकूण २ हजार १४० स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'सिम्बा-द लायन किंग' चित्रपट हिंदी, तेलुगू, इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये डब करण्यात आला आहे.