बिग बजेट 'साहो'ला मोठा फटका, मॉर्निंग शो केलेत रद्द, हे आहे कारण?

...म्हणून अनेक चित्रपटगृहात 'साहो'चे मॉर्निंग शो रद्द  

Updated: Aug 30, 2019, 08:32 PM IST
बिग बजेट 'साहो'ला मोठा फटका, मॉर्निंग शो केलेत रद्द, हे आहे कारण? title=

मुंबई : 'बाहुबली' फेम प्रभासचा बहुचर्चित चित्रपट 'साहो' आज देशभरात १०० हून अधिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. 'साहो'तील अॅक्शन, ड्रामा, रोमान्स, व्हिजुअल इफेक्ट्स, भरभक्कम बजेट या गोष्टी प्रेक्षकांना आकर्षित करत असल्या तरी, चित्रपटाच्या कथानकाने चाहत्यांची निराशा केली आहे. प्रदर्शित झाल्याच्या काही तासांतच 'साहो' ऑनलाइन लीक झाला. आता चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी नुकसान पोहचणार असल्याचं समोर आलं आहे. 

अनेक ठिकाणी 'साहो'च्या प्रदर्शनाच्या पहिल्याच हिंदी भाषेतील 'साहो'चे मॉर्निंग शो रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. 'साहो'च्या २ हजार प्रिंट चित्रपटगृहात वेळेत पोहचू न शकल्याने अनेक चित्रपटगृहात मॉर्निंग शो रद्द करण्यात आले.

FILM REVIEW: एक्शन दमदार पर फीकी है 'SAAHO' की कहानी...

मिडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर भारतातील अनेक शहरांत प्रिंट वेळेत पोहचली नाही. याठिकाणी चित्रपटाची दुपारनंतरच सुरुवात झाली. त्यामुळे मॉर्निंग शोमधील अधिकाधिक प्रेक्षक चित्रपटापासून दूर झाले. याचा थेट परिणाम चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होण्याची शक्यता आहे.

'साहो' भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वाधिक बजेट असणारा चित्रपट असल्याचं बोललं जात आहे. सुजीथ यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. चित्रपटात जॅकी श्रॉफ, नील नितिन मुकेश, मंदिरा बेदी, चंकी पांडे, महेश मांजरेकर या कलाकारांनी भूमिका साकारली आहे.