Wedding Bells : काजल अग्रवालच्या हाती चढला मेहेंदीचा रंग

पाहा तिच्या मेहेंदी समारंभातील खास लूक आणि हा खास फोटो   

Updated: Oct 29, 2020, 05:36 PM IST
Wedding Bells : काजल अग्रवालच्या हाती चढला मेहेंदीचा रंग
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अवघ्या एका दिवसामध्ये बॉलिवूडची ही सौंदर्यवती, अर्थात अभिनेत्री काजल अग्रवाल विवाहबंधनात अडकणार आहे. गौतम किचलू याच्यासह काजल साता जन्मांच्या बंधनात अडकणार आहे. अतिशय मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा हा विवाहसोहळा पार पडणार आहे. 

तत्पूर्वी बुधवारपासूनच काजलच्या घरी आणि सहाजिकच गौतमच्याही घरी लग्नापूर्वीच्या समारंभांना सुरुवात झाली आहे. खुद्द काजलनेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या सोहळ्यादरम्यानचा एक छानसा फोटो शेअर केला आहे. हा फोटो काजलच्या मेहेंदी समारंभातील असल्याचं लक्षात येत आहे. 

निमित्त ठरतंय ते म्हणजे तिच्या हातांवर असणारी मेहेंदी. मेहेंदी मिरवत काजलनं या फोटोसाठी पोझ दिली आहे. ख्यातनाम वेडिंग फोटोग्राफर जोसेफ रॅधिकनं तिची ही झलक टीपली आहे. ज्यामध्ये मिंट ग्रीन रंगाचा सलवार सुट आणि सोनेरी चांदबालीमुळं तिचं सौंदर्य आणखीन खुलून आलं आहे. 

 
 
 
 

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

 

फार काही कॅप्शन न देता तिनं या फोटोचीच भाषा सर्वांपर्यंत पोहोचवली आहे. #kajgautkitched अवघा हा एक हॅशटॅग तिनं या फोटोसोबत लिहिला आहे. अतिशय आनंदात दिसणाऱ्या काजलच्या या अदा आणि तिच्या आयुष्यात होणारी सुखाची उधळण पाहता भावी वाटचालीसाठी चाहत्यांनी आतापासूनच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.