वऱ्हाड निघालं राजस्थानला, विकी-कतरिनाचा एअरपोर्ट लूक व्हायरल

 कतरिना कैफ आणि विकी कौशल हे कपल आज मुंबईहून राजस्थानसाठी रवाना झाले आहेत.

Updated: Dec 6, 2021, 07:19 PM IST
 वऱ्हाड निघालं राजस्थानला, विकी-कतरिनाचा एअरपोर्ट लूक व्हायरल title=

मुंबई : कतरिना कैफ आणि विकी कौशल हे कपल आज मुंबईहून राजस्थानसाठी रवाना झाले आहेत. जिथे ते या आठवड्यात लग्न करणार आहेत. यावेळी कतरिनाटरिना कैफ, नटून थटून सगळे श्रृंगार परिधान करून बाहेर पडली.  तिचे फोटो काढण्यासाठी दिवसभर तिच्या घराबाहेर थांबलेल्या पापाराझींना  तिने फोटोसाठी पोझ देखील दिल्या. 

मुंबई विमानतळावर स्पॉट झालेल्या विक्की कौशलने कतरिनाला मँचिंग रंगाचा शर्ट परिधान केला होता. दोन्ही अभिनेत्यांसोबत त्यांचे कुटुंबीय आणि इतर सदस्यही होते. सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्सेस रिसॉर्ट, फोर्ट बरवारा येथे लग्न आणि सगळे विधी होतील. 7 आणि 8 डिसेंबरला संगीत आणि मेहंदी आणि 9 डिसेंबरला लग्न होणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाबाबत सातत्याने ताज्या बातम्या समोर येत आहेत. आता सातत्याने सगळ्यांचा लक्ष याकडे आहे की, लग्नासाठी  कोण कोण पाहुणे राजस्थानला पोहोचतायेत. त्याचबरोबर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नासाठी कोण राजस्थानला पोहोचले आहेत यांचे देखील सोशल मीडियावर फोटो समोर येत आहेत.

कतरिना कैफच्या बहिणीचा पहिला फोटो आला असून ती जयपूरला पोहोचली आहे. इतकंच नाही तर कतरिना कैफची मैत्रिण अनैता श्रॉफ अदजानियाही जयपूरला पोहोचली आहे. तिने कतरिना कैफचा लूक फायनल केल्याचं सांगितले जात आहे. नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये कतरिना कैफ जयपूरला निघताना दिसत आहे.