मुंबई : चित्रपट निर्माता करण जोहर सध्या त्याच्या 'कॉफी विथ करण' चॅट शोमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर, त्याला कोर्टाने समन्स बजावल्याची बातमी समोर येत आहे. पण हे समन्स त्याला कोणत्याही खऱ्या कोर्टाने पाठवलेले नाही तर ' 'केस तो बनता है'' या कॉमेडी कोर्ट शोने पाठवले आहेत. ज्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
चित्रपट निर्माता करण जोहर 'केस तो बना है' या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे. जिथे अनेक स्टार्सवर वकील रितेश देशमुखच्या मजेदार आरोपांना सामोरं जावं लागणार आहे. तर डिफेंस लॉयर वरुण शर्मा त्यांचा बचाव करताना दिसणार आहे. करण जोहरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्या एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे. यादरम्यान तो रितेशसोबत फोनवर झालेल्या संभाषणात समन्सला उत्तर देताना ऐकू येत आहे.
आधी तो रितेशचा अपमान करतो आणि त्याच्याकडे त्याचा नंबर नसल्याचं सांगतो, मग तो रितेशला विचारतो की, मला समन्स का पाठवले? माझ्यामुळे लोकं स्वत:च रहस्य लपवू शकत नाहीत का? करणने उत्तर दिलं की, हा फक्त अंदाज आहे. प्रत्येकजण माझ्याशी गोष्टी शेअर करतो. यात माझा कसा दोष असेल, ज्यानंतर तो या आरोपांना न्यायालयात सामोरं जाण्याचं आश्वासन देतो आणि नंतर फोन कट करतो आणि म्हणतो, 'केस तो बनता है'!
इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना करणने लिहिलं की, 'रितेश देशमुख, माझ्याशी बोलू नकोस, माझा वकील वरुण शर्माशी बोल! मी 'केस तो बना है'वर का येत आहे.' हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यावर चाहते जोरदार कमेंट करत आहेत. केस तो बना है हा एक कॉमेडी शो आहे, जो 29 जुलैपासून Amazon MiniTV वर प्रसारित होत आहे. जो पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.