Feroz khan and Fardeen Celina Jaitly: बॉलिवूड अभिनेका फरदीन खान यांच्या घटस्फोटाला काल पासून चर्चा सुरु झाली आहे. ते दोघे गेल्या वर्षभरापासून वेगळे राहत असल्याचे देखील म्हटले जात होते. इतकेच नाही तर फरदीन त्याच्या आईसोबत मुंबईत राहतोय. तर त्याची पत्नी नताशा माधवानी ही लंडनमध्ये राहत असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, आता एक मोठी बातमी समोर येत आहे आणि ती म्हणजे काही दिवसांपूर्वी एका पाकिस्तानी चित्रपट समीक्षकाने सेलिना जेटलीविषयी एक विचित्र कमेंट केली होती. तो म्हणाला होता की सेलिना जेटलीचे फरदीन आणि त्याचे वडील फिरोज या दोघांसोबत शारीरिक संबंध होते. आता फरदीनच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये या गोष्टीला देखील चर्चा सुरु झाली आहे.
पाकिस्तानच्या चित्रपट समीक्षकानं अशी कमेंट केली असता. त्यावर मात्र, सेलिनानं सडेतोड उत्तर दिलं आहे. इतकंच नाही तर सेलिनानं परराष्ट्र मंत्रालयाकडे मदतीची मागणी केली आहे. खरतरं सेलिनानं 2003 साली प्रदर्शित झालेल्या 'जानशीन' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता फिरोज खान आणि फरदीन खानसोबत दिसली होती. त्यामुळे तिच्या आणि फरदीनच्या रिलेशनशिपच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. त्यावेळी देखील सेलिनाचे फरदीन आणि फिरोज या दोघांसोबत रिलेशनशिप असल्याच्या अफवा देखील सुरु होत्या.
A few months ago, a self-proclaimed Hindi film critic and journalist from Pakistan named @UmairSandu took to Twitter to make viral untrue horrific claims about me which included bizarre allegations like my relations with both my mentor Feroz Khan and his son Fardeen , in addition… pic.twitter.com/xAtxdE8Jzb
— Celina Jaitly (@CelinaJaitly) July 30, 2023
यंदाच्या वर्षीच पाकिस्तानी पत्रकार उमैर संधूनं एक ट्वीट केलं की 'सेलिना जेटली बॉलिवूडची एकमेव अशी अभिनेत्री आहे जिचं वडील फिरोज खान आणि मुलगा फरदीन खान या दोघांसोबत शारिरीक संबंध होते. त्याच ट्वीटवर सेलिनानं उत्तर दिले. सेलिना म्हणाली, काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानी पत्रकार उमैर संधूनं माझ्याविषयी खोटे दावे केले होते. ज्यात माझे गुरु फिरोज खान आणि त्यांचा मुलगा फरदीन खान यांच्याशी माझे शारिरीक संबंध असल्याचा दावा केला होता. इतकंच नाही तर त्यांनी ऑस्ट्रेलियात माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेवर देखील निशाणा साधला होता. पाकिस्तानमध्ये त्याच्या या खोट्या बातमीवर माझी रिअॅक्शन व्हायरल झाली आहे आणि पाकिस्तानी लोकांसोबत लाखो नेटकरी मला पाठिंबा देत आहे. कारण त्यांना देखील हे पाहून आश्चर्य झाले आहे. '
पुढे सेलिना म्हणाली की, 'उमैर ऑनलाइन त्याची सतत जागा बदलतोय आणि पाकिस्तानमध्ये लपून बसला आहे. त्यामुळे त्याच्या विरोधाता कोणतीही अॅक्शन घेणं माझ्यासाठी कठीण झालं आहे. अखेर मी भारतातील राष्ट्रीय महिला आयोगाकडे याप्रकरणी मदत मागितली. आयोगाने माझ्या तक्रारीची दखल घेत आवश्यक कार्यवाही सुरू करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सहसचिवांना (PAI विभाग) उद्देशून पत्र लिहिलं. मंत्रालयाने या घटनेकडे अत्यंत गांभीर्याने पाहिलं असून या घटनेची लगेचच चौकशी आणि कारवाईची मागणी करत नवीन दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तांकडे हा मुद्दा उपस्थित केला असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.'
हेही वाचा : 'बाईपण भारी देवा' नं रितेश देशमुखच्या 'वेड'ला टाकल मागे, केली इतक्या कोटींची कमाई
पुढे याविषयी सविस्तर बोलत सेलिना म्हणाली की ‘माझ्यासाठी हा केवळ माझ्या चारित्र्यावरील हल्ल्याविरोधातचा लढा नाही. तर हा हल्ला माझ्या मातृत्वावर, कुटुंबावर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे गुरू फिरोज खान यांच्यावर होता. ते माझे मार्गदर्शक आणि मित्र होते. त्यांनी मला दिलेल्या प्रेम, आदर आणि करिअरमधील संधीबद्दल मी सदैव त्यांची कृतज्ञ राहीन. मी भारतीय सैन्यातील योद्धाची मुलगी आहे. या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी पाकिस्तानला जावं लागलं तरी मी गेले असते. या प्रकरणात मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे’