'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर भाऊने उडवली रेणुका शहाणेची खिल्ली

मुंबई : माधुरी दीक्षितच्या बकेट लिस्ट या सिनेमाची चर्चा जोरदार वाढली आहे. अशातच झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या शोमध्ये बकेट लिस्ट या सिनेमाच्या कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी रेणुका शहाणे देखील या शोमध्ये उपस्थित होत्या. या शोमध्ये हास्यसम्राट भाऊ कदमने चक्क रेणुका शहाणेची फिरकी घेतली आहे. रेणुका शहाणे यांचा विवाह बॉलिवूडमधील लोकप्रिय व्हिलन आशुतोष राणा यांच्यासोबत झालं आहे. राणा यांचा आतापर्यंतचा अभिनयाचा ग्राफ बघता त्यांच्या नकारात्मक सिनेमे अतिशय गाजले आहेत.

सतत हसत असलेली रेणुका शहाणे यांनी आशुतोष राणांसोबत प्रेमविवाह केला आहे. त्यामुळे या दोघांची लव्हस्टोरी प्रत्येकासाठी उत्सुकतेची आहे. अशातच भाऊ कदम याने घेतलेली फिरकी ही अतिशय मजेशीर आहे. तसेच या सिनेमाच्या निमित्ताने माधुरी दीक्षित आणि रेणुका शहाणे या दोघी तब्बल 24 वर्षांनी एकत्र काम केलं आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघींचा लो चली मै.. या गाण्यावर डान्स केला होता. आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.