मुंबई : 'मी माझी जोडीदार गमावली... तिनं या आजाराशी बऱ्याच वर्षांपासून लढा दिला तोही एखाद्या विजेत्याप्रमाणं... आज मात्र शरीरातील बहुविध अवयव निकामी झाल्यामुळं माझ्या मिठीत तिनं अखेरचा श्वास घेतला', अशी अतिशय भावनिक पोस्ट सोशल मीडियावर सर्वांच्या डोळ्यात पाणी आणून गेली.
तिच्यासोबतचा या सेलिब्रिटीचा फोटो पाहताना अनेकांना लक्षात येईना, पण नंतर कळलं की या सेलिब्रिटीच्या बहिणीनं त्याची साथ सोडली.
वयाच्या 47 व्या वर्षी शेफ विकास खन्नाच्या बहिणीनं अखेरचा श्वास घेतला.
विविध कुकरी शो, रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकपदी असणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय हॉटेलिंग विश्वात भारताचं नाव उंचावणाऱ्या सेलिब्रिटी शेफ विकास खन्नाचं कुटुंब प्रचंड दु:खात आहे. (Vikas Khanna)
कुटुंबाशी खास नातं जपणारा विकास बहिणीच्या जाण्यानं पुरता तुटला आहे. ही बातमी आणि त्याची पोस्ट वाचताच अनेकांनीच त्याला आधार देण्याचा प्रयत्न केला.
विकास खन्ना यांची बहिणी राधिका हिला Lupus, aHUS आजार होता. ज्याची ती झुंजदेत होती. पण, रेनल फेल्युअर आणि शरीरातील अनेक अवयव निकामी झाल्यामुळं तिच्यावर काळानं घाला घातला.
तिच्या जाण्यानं विकासच्या आयुष्यातून एक हक्काचं माणून कायमचं निघून गेलं, ज्यातून सावरण्यासाठी आता त्याला बराच वेळ जाणार यात दुमत नाही.