मुंबई : वादग्रस्त अभिनेत्री पूनम पांडे सध्या अभिनेत्री कंगना रानौतच्या तुरूंगात कैद आहे. यावेळी तिने लग्नाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. पूनमचं लग्न सॅम बॉम्बेसोबत झालं होतं. पण त्यांचं नात फार काळ टिकू शकलं नाही. सॅम पूनमला मारहाण करत असल्यामुळे तिला ब्रेन हॅमरेजचा त्रास सुरू झाला असल्याचं देखील पूनमने यावेळी सांगितलं.
पूनम पांडेने मारहाण केल्याची तक्रार केली आणि यानंतर लगेच याच्या विरोधात कारवाईही करण्यात आली. तक्रार नोंदवल्यानंतर पूनमला रुग्णालयात दाखलं देखील करण्यात आलं. या मारहाणीमध्ये पूनमला गंभीर दुखापत झाली आहे.
पूनम पांडेने पती विरोधात छेडछाड, धमकी देण्यासाठी आणि मारहाण केल्याचा आरोप केला होता. या आरोपांनंतर सॅमला गोवा पोलिसांनी अटक देखील केली होती. मात्र नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आलं होतं. जामिनावर सुटका झाल्यानंतर पुन्हा एकदा पूनम पांडेच्या एफआयआरवर सॅम बॉम्बेला अटक केलं.
कंगनाच्या शोमध्ये पूनमने तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला. सॅम मला सतत मारायचा. सतत माझ्यावर संशय घ्यायचा. घरातही मला फोन वापरू द्यायचा नाही. आज माझ्याकडे सगळ काही आहे. पण सुखी आयुष्य जगू शकले नाही.
ती पुढे म्हणाली, 'मी त्याच्यावर प्रेम केलं. पण त्याच्याकडून मला फक्त त्रास मिळाला. आजही मी त्या दुःखातून बाहेर आले नाही. त्याच्या अशा वागण्यामुळे अनेक गोष्टींचा सामना करावा लागाला...'
कोण आहे सॅम बॉम्बे
सॅम बॉम्बेचा जन्म संयुक्त अरब अमीरातच्या दुबईमध्ये झाला. तो एक ऍड फिल्म निर्माता आहे. ३६ वर्षीय सॅम अक्षय कुमार, रणबीर कपूर, दिपीका पदुकोण,जॅकलिन याचबोरबर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसोबत त्याने प्रोजेक्ट केले आहेत.