तब्बल 6 तासांच्या Breast Cancer सर्जरीनंतर अभिनेत्री वेदनेनं कळवळली, पाहून तुमचेही डोळे पाणावतील

हिंदी मालिका विश्वातील अभिनेत्री छवी मित्तलवर नुकतीच ब्रेस्ट कॅन्सर शस्त्रक्रिया पार पडली...शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर छवीने शस्त्रक्रियेचा अनुभव सांगितला. जो ऐकून सर्वांचेच डोळे पाणावतील

Updated: Apr 26, 2022, 03:11 PM IST
तब्बल 6 तासांच्या Breast Cancer सर्जरीनंतर अभिनेत्री वेदनेनं कळवळली, पाहून तुमचेही डोळे पाणावतील  title=

मुंबईः गेल्या काही वर्षांमध्ये महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे. असाच काहीसा अनुभव घेतला आहे अभिनेत्री छवी मित्तलनं.

कॅन्सरच्या शस्त्रक्रियेनंतर छवीनं अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हिंदी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री छवी मित्तलवर नुकतीच ब्रेस्ट कॅन्सरची शस्त्रक्रिया पार पडली. ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती छवीने यापूर्वीच सोशल मीडियावर शेअर केली होती.

छवीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, भूल देण्यासाठी आलेले डॉक्टर मला मनात काहीतरी चांगला विचार करण्यास सांगत होते, तेव्हा मनातल्या मनात माझी ब्रेस्ट हेल्दी झाली असून 
कॅन्सरमुक्त झाल्याचा मी विचार केला. त्यानंतर मला सर्जरीसाठी नेण्यात आलं. त्यानंतर जी बातमी मला समजली ती मी कॅन्सरमुक्त झाल्याचीच होती.

जवळपास 6 तास ही शस्त्रक्रिया चालली. माझ्यावर वेगवेगळ्या प्रोसेस करण्यात आल्या. हा सर्व प्रवास खूप मोठा होता. मात्र यात सर्वात चांगली गोष्टी हीच आहे की, आता इथून पुढे सर्व चांगलंच होणार आहे. वाईट वेळ निघून गेली आहे.

तुमच्या प्रार्थना, शुभेच्छा माझ्या सोबत होत्याच, यापुढेही मला त्या हव्या आहेत. कारण या वेदनांमधून बाहेर पडण्यासाठी त्याची आवश्यकता आहे, ती वेदना अशी आहे जिच्यावर मी हसत-हसत मात केली, असंही छवीनं म्हटलं आहे.