Guess Who: फोटोत असलेल्या 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?

26 वर्षाने लहान तरूणीसोबत लग्न, देशातला टॉपचा मॉडल, 'या' अभिनेत्याला तुम्ही ओळखलंत का?

Updated: Oct 31, 2022, 09:33 PM IST
 Guess Who: फोटोत असलेल्या 'या' अभिनेत्याला ओळखलंत का? title=

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) स्टार्सचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल (video) होत असतात. यातले काही फोटो हे लहाणपणीचे असतात, तर काही फोटो हे प्रौढ अवस्थेतले असतात. असाच एक फोटो समोर आला आहे. या फोटोतील अभिनेत्याला तुम्हाला ओळखायचे आहे. 

फोटोत काय?

या फोटोत दिसणारा हा मुलगा देशातील टॉपचा मॉडेल बनला आहे. यासोबतच तो अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही देखील दिसला आहे. एवढेच नाही तर आजकाल तो त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत असतो. विशेष म्हणजे हा अभिनेता सहजासहजी स्वत:सोबत सेल्फी काढत नाही. त्यासाठी काही अटी घातल्या आहेत, त्या आधी पूर्ण कराव्या लागतात.

कोण आहे 'हा' अभिनेता?

हा मॉडेल-अभिनेता दुसरा कोणी नसून 1995 मधील सुपरहिट म्युझिक व्हिडिओ फेम मिलिंद सोमण (Milind Soman) आहे. मिलिंद सोमणचा डोक्याभोवती स्कार्फ गुंडाळलेला हा बालपणीचा फोटो आहे. या फोटोत मिलिंद सोमण 6 वर्षांचा आहे. हा फोटो त्याने गेल्या वर्षी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता.

फोटो काढण्याची अट काय? 

मिलिंद सोमण (Milind Soman) बाबतची खास गोष्ट म्हणजे तो फिटनेसकडे खूप लक्ष देतो. जर एखाद्याला मिलिंद सोमणसोबत सेल्फी घ्यायचा असेल तर त्याला आधी 10 पुशअप करावे लागतील. तुम्ही अगदी बरोबर ऐकले आहे, मिलिंद सोमणने (Milind Soman) त्यांच्या चाहत्यांसाठी ही अट ठेवली आहे. मात्र, काही विशेष प्रकरणांमध्ये त्यांनी या अटीतून सूट देखील दिली आहे.

दरम्यान अनेकांना हा अभिनेता ओळखता आला आहे तर, तर अनेकांना अपयश देखील आले आहे.