Generation Beta : 2025 हे वर्ष अतिशय खास असणार आहे. अवघ्या काही दिवसात हे 2024 हे वर्ष आता संपणार आहे. त्याच खास कारण काय? तर 2025 ते 2039 या काळात जन्मलेली मुलं जनरेशन बेटा बोलले जाणार आङे. महत्त्वाचं म्हणजे पालक जनरेशन वाय(Y) आणि जनरेशन झेड (Z) पिढीचे असणार आहे. 2025 जनरेशन बीटा असणार आहे. काही वर्षांपूर्वी Gen Z आणि अल्फा ही जनरेशन सुरु होती.
काय आहे जनरेशन बीटा?
जनरेशन बीटा 2025 आणि त्यानंतर जन्माला येणाऱ्या मुलांचा एक समूह आहे. या जनरेशनची मुले Gen Z आणि अल्फापेक्षाही हुशार असणार आहे. तसेच अल्पा जनरेश जशी जशी मोठी होईल तसेच तंत्रज्ञान देखील बदलणार आहे.
जनरेशन बीटाची लक्षणे
जनरेशन बीटाची मुले मोठी होईपर्यंत तंत्रज्ञान अजूनच प्रगत झालेलं असेल. हे जनरेशन AI आणि डिजिटल कनेक्टिवटी असलेलं जीवन जगणार आहेत. टेक्नॉलॉजी सर्वोतम असल्यामुळे या जनरेशनची सगळी कामे झपाट्याने आणि अक्षरशः बोटांवर होणार आहे. असं म्हटलं जातं की, नवीन पिढी ही जुन्या पिढीच्या तुलनेत अतिशय हुशार अशते. अशावेळी जनरेशन बीटा ही नवीन विचार आणि झपाट्याने ऍक्शन घेणारी पिढी आहे.
टेक्नॉलॉजी
अल्फा जनरेशनच्या मुलं अगदी आपल्या बालपणापासून स्मार्टफोन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या टेक्नॉलॉजीचा वापर करतात. तेथेच बीटा जनरेशनची मुले अल्फा जनरेशनच्या पण पुढे जाऊ शकतात.