फराह खानने बॉलिवूड अभिनेत्रीला दिली कानाखाली?

फराहच्या शोमध्ये ती लाफिंग बुद्धाची भूमिका साकारत आहे.

Updated: Sep 26, 2021, 07:50 AM IST
फराह खानने बॉलिवूड अभिनेत्रीला दिली कानाखाली?

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने त्या दिवसांच्या आठवणी परत आणल्या आहेत जेव्हा सेटवर फराह खानला सगळे घाबरत होते. अभिनेत्री म्हणाली की, जेव्हा सेटवर कोणी योग्य काम करत नाही तेव्हा तिला कोरिओग्राफर-फिल्ममेकर फराह खानने कानाखाली मारायची.
जुहीने हे झी कॉमेडी शोच्या सेटवर सांगितले, जिथे ती या आठवड्याच्या शेवटी स्पेशल गेस्ट म्हणून दिसणार आहे. फराहच्या शोमध्ये ती लाफिंग बुद्धाची भूमिका साकारत आहे.

आधी कानाखाली आता प्रेमाने कौतुक

जुही म्हणाली, 'मी झी कॉमेडी शो पाहिले आहेत आणि फराह सर्व विनोदी कलाकारांना खूप प्रेम कसे देते, पण पूर्वी जेव्हा आम्ही तिच्यासोबत काम करायचो तेव्हा आम्हाला जवळजवळ दररोज एक कानाखाली पडायची.'

ती म्हणाला, 'कधीकधी ती सेटवर येत असे आणि प्रत्येकजण मेहनत आणि तालीम करत असत, पण आम्ही जे करत होतो ते कदाचित त्यांना आवडत नसावे. तर ती संपूर्ण युनिटसमोर माईक घेऊन ओरडायची, काय रे? तुम्ही सर्व काय करत आहात? आम्हाला भीती वाटायची.