मुंबई : अभिनेता, दिग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शक म्हणून ओळख असणारा, दाक्षिणात्य कलाविश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारा Prabhudeva प्रभुदेवा लवकरच त्याच्या आयुष्याच्या नव्या वळणाव पोहोचणार असल्याचं म्हटलं जात आहे. हे वळण म्हणजे विवाहबंधनात अडकण्याचं.
प्रभुदेवा पुन्हा एकदा प्रेमात असल्याचं चर्चा आहे. इतकंच नव्हे, तर येत्या काळात तो या प्रेमाच्या नात्याला एक नवं नाव देत लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेणार असल्याचंही म्हटलं जात आहे. प्रभुदेवा हा त्याच्या भाचीसोबतच रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. नव्यानं प्रेमाच्या नात्याची अनुभूती घेणारा हा सेलिब्रिटी नात्याला पुढच्या टप्प्यावर नेत तिच्याशी लग्न करणार असल्याचं कळत आहे.
दरम्यान, अद्यापही याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळं चाहत्यांमध्येही प्रभुदेवाची नवी इनिंग नेमकी कशी असेल याबाबतची कमालीची उत्सुकता आणु कुतूहल पाहायला मिळत आहे.
प्रभुदेवानं २०११ मध्ये पत्नी रामलता हिला घटस्फोट दिला होता. यानंतर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा हिच्यासोबतच्या त्याच्या नात्याबाबतच्या अनेक चर्चांनी दोर धरला होता. आता यामध्येच सर्व चर्चा दूर सारत भाचीशी तो खरंच विवाहबंधनात अडकणार का हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.