VIDEO: ''ज्या दादरच्या चाळीत वाढले...'' प्रिया बापटनं दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा

Priya Bapat at her Dadar Old House: 'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेबसिरिजच्या नव्या सिझनची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. पौर्णिमा गायकवाड मुख्यमंत्री होणार की नाही, मग त्यावरून काय रणनिती आणि डावपेच रंगतील याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. परंतु प्रियाचा एक व्हिडीओ (Priya Bapat Video) सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतो आहे.  

गायत्री हसबनीस | Updated: May 28, 2023, 01:49 PM IST
VIDEO: ''ज्या दादरच्या चाळीत वाढले...'' प्रिया बापटनं दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा  title=
May 28, 2023 | City of Dreams अभिनेत्री प्रिया बापट ही सध्या आपल्या सिटी ऑफ ड्रीम्सच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी तिनं आपल्या जुन्या दादरच्या चाळीतल्या घराला भेट दिली आहे. यावेळी तिनं आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे . (Photo: Priya Bapat Instagram)

City of Dreams S3 Promotion: अभिनेत्री प्रिया बापट आपल्या 'सिटी ऑफ ड्रिम्स' (Priya Bapat City of Dremas) या नव्या सिझनच्या प्रमोशनध्ये व्यस्त आहे. 26 मे रोजी 'सिटी ऑफ ड्रिम्स'चा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेम, राजकारण, नाती, हिंसा, शिव्या, डावपेच, सत्ता, महिला मुख्यमंत्री, बापलेकीचं नातं, मैत्री, आशा-निराशा अशा अनेक कांगोऱ्यांनी समृद्ध अशी ही वेबसिरिज आहे. पहिल्या दोन सिझनमधून आपल्याला पौर्णिमा गायकवाडचा राजकीय आणि वैयक्तिक प्रवास पाहायला मिळाला आहे. आता या तिसऱ्या आणि नव्या सिझनमध्ये पौर्णिमा गायकवाड मुख्यमंत्री होणार का? मग तिचा पुढील प्रवास कसा असेल? याची उत्तरं ही वेबसिरिज पाहिल्यावरच समजेल. प्रिया ही मराठी-हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

ती इन्टाग्रामवरही चांगलीच (Priya Bapat Instagram) सक्रीय असते. ती आपले लेटेस्ट अपडेट्स हे सोशल मीडियावरून शेअर करते. यावेळी तिनं आपला एक असाच नॉस्टॅलिया व्हिडीओ (Nostalgia Video) हा सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की प्रिया सिद्धिविनायकच्या दर्शनला येते त्यानंतर ती आपल्या दादरच्या चाळीत पोहोचते. (city of dreams season 3 promotion lead actress priya bapat visits siddivinayak temple and her old dadar childhood home)

तिनं हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ''घर म्हणजे जिथे स्वप्ने फुलतात आणि मी माझ्या शहराची कायमच ऋणी आहे. या दादरच्या चाळीपासून (जेथे मी लहानाची मोठी झाले) ते जे प्रेम मला देशभरात आणि पलीकडेही मिळतं आहे. या जागेने मला सर्व काही दिले आहे आणि त्या सर्वांसाठी मी कृतज्ञ आहे!'' यावेळी तिनं या व्हिडीओमध्ये आपल्या जुन्या चाळीबद्दल सांगताना आपल्या पहिल्या गणशोत्सवाच्याही आठवणी सांगितल्या आहेत. 

हेही वाचा - VIDEO:''उरलेलं जेवण घरी...'' भर शोमध्ये कृष्णा अभिषेक अर्चना पूरण सिंगकडे बोट दाखवून असं का म्हणाला?

प्रिया ही आपल्या फॅशन स्टाईलसाठीही ओळखली जाते. सोबतच प्रिया ही खूप फीट असते. ती कायमच इन्टाग्रामवरून आपलं फीटनेस अपडेटही चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिचा फिटनेस पाहूनही प्रेरणा मिळते. प्रियाच्या टसिटी ऑफ ड्रीन्सटमधल्या लेसबियन सीनच्या बरीच चर्चा झाली होती. त्यावरून तो व्हिडीओ बराच व्हायरलही झाला होता. परंतु अनेक मुलाखतीतून प्रियानं यावर भाष्यही केले आहे. हा माझ्या कामाचाच एक भाग आहे. तेव्हा तो सीन का आहे हे पाहण्यासाठी संपुर्ण सिरिज पाहा आणि मग ठरवा असं म्हणत तिनं स्पष्टीकरण दिले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या सिझनमध्ये अभिनेते अतुल कुलकर्णी आणि प्रिया बापट बापलेकीच्या भुमिकेत आहेत. याआधी त्यांनी 2014 साली आलेल्या 'हॅप्पी जर्नी' या चित्रपटातून भाऊ आणि बहीणीची भुमिका केली होती. सध्या 'सिटी ऑफ ड्रिम्स' या सिरिजच्या सगळीकडेच बरीच चर्चा आहे.