व्हिडिओ : कॉमेडी क्वीन भारती सिंग जेव्हा रडते...

 टीव्ही जगतातील कॉमेडी क्वीन भारती सिंगला नव्या ओळखीची गरज नाही. 

Updated: Jul 13, 2018, 08:40 AM IST
व्हिडिओ : कॉमेडी क्वीन भारती सिंग जेव्हा रडते... title=

मुंबई : टीव्ही जगतातील कॉमेडी क्वीन भारती सिंगला नव्या ओळखीची गरज नाही. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज ते डान्स दिवाने पर्यंत भारतीचा टेलिव्हीजनवरील प्रवास लांब पल्लाचा होता. या प्रवासात भारतीने प्रेक्षकांना भरभरून हसवले. त्यांच्या मनात स्थान निर्माण केले.

अलिकडेच भारतीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. त्यात मात्र ती हसण्याऐवजी रडताना दिसत आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. व्हिडिओत 'हमारी अधूरी कहानी' सिनेमाचे टायटल ट्रॅक सुरु आहे. हा व्हिडिओ पाहुन हसवणारी भारती नेमकी का रडत आहे..? हा प्रश्न तुम्हाला पडेल. पण याचा खुलासा भारतीने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये केला आहे. 

 

Yaar dekho main bahut acchi actress hoon main sirf comedy nahi emotional acting bhi kar sakti hoon #timepass #trave#bharsh

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen) on

या व्हि़डिओ कॅप्शनमध्ये भारतीने लिहिले की, यार, पहा मी किती चांगली अभिनेत्री आहे. मी फक्त कॉमेडीच नाही तर इमोशनल अक्टिंगही करु शकते. आणि पुढे हॅशटॅग टाईमपास लिहिले दिसत आहे. याचा अर्थ हा व्हिडिओ जस्ट फन म्हणून तिने केला आहे.

भारती सिंग लवकरच टीव्हीवरील लोकप्रिय स्टंट शो खतरों के खिलाडीमध्ये दिसेल. यात ती तिच्या नवऱ्यासोबत हर्ष लिंबाचिया सोबत सहभागी होणार आहे. यासाठी ते दोघेही अर्जेंटीनाला रवाना झाले आहे. सध्या भारती, अर्जुन बिजलानीसोबत डान्स रियालिटी शो 'डान्स दिवाने' चे होस्टींग करत आहे.