Maharashtra Rain Update : राज्याला गेले तीन महिने झोडपून काढणारा पाऊस आता परतीच्या प्रवासातही रौद्र स्वरुप धारण करणार आहे. जाता पाऊस धुमाकूळ घालणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार आहे. यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान विभागाकडून एनेक जिल्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
वायव्य राजस्थान आणि कच्छ परिसरातून नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सोमवारपासून म्हणजेच 23 सप्टेंबर सुरू झाला आहे. यंदा सलग 14 व्या वर्षी परतीचा प्रवास विलंबाने सुरू झाला. सामान्यपणे 17 सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू होतो. यंदा सात दिवस उशिराने परतीचा प्रवास सुरू झाला आहे.
राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण या ठिकाणी बादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून राज्यातील काही जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. दरम्यान, सोमवारी रात्री ठाण्यासह नवी मुंबई, पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. ठाण्यात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते तसेच अधूनमधून एखादी सर येऊन गेली.
विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबई आणि कोकणातही जोरदार पाऊस कोसळेल. पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, घाराशीव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावलीय.. त्यामुळे उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. मात्र पावसामुळे अनेक सखोल भागात पाणी ही साचलं... तर या परतीच्या पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा, इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय.
IND
387(112.3 ov)
|
VS |
ENG
108/3(33.3 ov)
|
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 166/8
|
VS |
GER
158(19.5 ov)
|
Malawi beat Germany by 8 runs | ||
Full Scorecard → |
TAN
(20 ov) 154/7
|
VS |
BRN
157/4(16.2 ov)
|
Bahrain beat Tanzania by 6 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.