मुंबई : अभिनेता आमिर खान (Aamir Khan)स्टारर 'लाल सिंग चड्ढा' सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अभिनेता अडचणी सापडला आहे. एवढंच नाही तर आमिर विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी गर्दी तर करत आहेत, पण अभिनेत्यावर अनेक आरोप देखील लावत आहेत. जाणून घेऊ 'लाल सिंग चड्ढा' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर निर्माण झालेले वाद
रिपोर्टनुसार शुक्रवारी आमिर विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. दिल्लीतील वकील विनीत जिंदाल यांनी आमीर खानविरुद्ध खटला दाखल करताना भारतीय लष्कराचा अपमान आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.
आमिर खानसोबतच वकिलाने लाल सिंग चड्ढा सिनेमाचे दिग्दर्शक आणि पॅरामाउंट पिक्चर्स प्रोडक्शन विरोधात तक्रार दाखल केली. आपल्या तक्रारीत त्यांनी लिहिले आहे की, चित्रपटातील अनेक मजकूर आक्षेपार्ह आहेत. त्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
फक्त आमिर आणि दिग्दर्शकांविरोधात तक्रारच नाही तर, गंभीर आरोप देखील करण्यात आले आहेत, 'सिनेमाची कथेत एका मतिमंद व्यक्तीला कारगिल युद्ध लढण्यासाठी सैन्यात भरती करण्यात आल्याचं दाखवण्यात आलं आहे, पण युद्धात शूर सैनिकांना पाठवण्यात आलं होतं.' त्यामुळे सिनेमात भारतीय लष्कराची बदनामी केल्याचं दाखवण्या आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
'आमिर खान हा मोठा आणि प्रसिद्ध अभिनेता आहे, त्यामुळे त्याच्या बोलण्याचा मोठा प्रभाव पडू शकतो. असा आरोप देखील वकील विनीत जिंदाल यांनी केला आहे. हिंदू समाजासाठी अभिनेत्याचे हे विधान देशाची सुरक्षा, शांतता बिघडवण्याचे काम करू शकते. असं देखील तक्रारीत दाखल करण्यात आलं आहे. 11 ऑगस्ट रोजी आमिर खानचा सिनेमा लाल सिंह चड्ढा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.