Deepika Tested Positive : दीपिकाला कोरोनाची लागण, वडिलांना रूग्णालयात केलं दाखल

कुटुंबासह दीपिकाला कोरोनाची लागण 

Updated: May 5, 2021, 08:37 AM IST
Deepika Tested Positive : दीपिकाला कोरोनाची लागण, वडिलांना रूग्णालयात केलं दाखल

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांना गाठलं. यामध्ये बॉलिवूड कलाकारांचा देखील समावेश आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणलाही कोरोनाची लागण झाली आहे. या अगोदर दीपिकाच्या कुटुंबाला देखील कोरोनाची लागण झाली होती. (Coronavirus: Actor Deepika Padukone tests positive) दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण यांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यानंतर दीपिकाने देखील कोरोनाची चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह आली आहे. 

दीपिकाचे वडील मागील आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह आली होती. त्यांची तब्येत बिघडल्यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर आता स्वत: दीपिकालाही कोरोनाची लागण झाली आहे.

गेल्या महिन्यात रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी बंगळुरूला गेले होते. दीपिकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येण्यापूर्वी तिच्या कुटुंबाला लागण झाल्याची माहिती मिळाली. वडिलांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली होती. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना बंगळुरुमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे दीपिकाच्या आई उज्ज्वला पदुकोण आणि बहीण अनिषा ही कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यानंतर आता दीपिकाही कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे तिचं पूर्ण कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बॉलिवूडचे अनेक कलाकार कोरोना संक्रमित झाले. अनेक दिग्गज कलाकारांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे. तर काहींनी आपल्या जवळच्या व्यक्तींना देखील गमावलं. तर अनेक कलाकारांनी कोरोनावर यशस्वी मात केलीय. त्यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, कॅटरिना कैफ, रणबीर कपूर, आलिया भट, विकी कौशल, भूमी पेडणेकर, सोनू सूद, अभिजीत सावंत, शुभांगी अत्रे यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे.