बिग बी म्हणतात,'Corona तर पाठच सोडत नाही'

अशी का आली महानायकावर वेळ 

Updated: Apr 26, 2020, 12:07 PM IST
बिग बी म्हणतात,'Corona तर पाठच सोडत नाही' title=

मुंबई : कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. मात्र आता त्यांनी BREAKING NEWS म्हणत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामुळे बिग बींचे चाहते देखील हैराण झाले आहेत. 

अमिताभ बच्चन यांनी म्हटलंय की,'ब्रेकिंग न्यूज, या वेळेची सर्वात मोठी बातमी..एक वाटवाघूळ आता माझ्या खोलीत.... जलसाच्या तिसऱ्या माळ्यावर वटवाघूळ घुसला आहे. या मजल्यावर आम्ही सगळेजण बसतो आणि मजा करतो. या अगोदर वटवाघळाला या परिसरात कधीच पाहिलं नाही. आणि आता त्याला आमचचं घर मिळालं का? कोरोनातर आमची पाठच सोडत नाही. उडत उडत आमच्याकडेच येत आहे.'

यानंतर महानायकाच्या पोस्टवर अनेक युझर्स कमेंट करत आहेत. त्यामध्ये अनेक सेलेब्सचा देखील समावेश आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकरने देखील कमेंट केली आहे. अभिनेत्री अहाना कुमारा बिग बींना काळजी घेण्याची विनंती केली आहे.