तो पुन्हा आलाय! अभिनेत्री माही विज, राज कुंद्राला कोरोनाची लागण

Celebs Infected From Corona Virus: कोरोनाने पुन्हा एकदा जोरदार हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. राज्यात 2 आठवड्यापूर्वी नियंत्रणात असलेल्या रुग्णात वाढ झाली आहे. परिणामी मनोरंजन क्षेत्रात ही रुग्ण संख्येत वाढताना दिसते. 

Updated: Mar 30, 2023, 06:23 PM IST
तो पुन्हा आलाय! अभिनेत्री माही विज, राज कुंद्राला कोरोनाची लागण
Covid Positive Celebrities

Mahhi Vij Covid Positive: राज्यात कोरोना (corona update) रुग्णांचे प्रमाण गेल्या महिन्याच्या तुलनेत तीन टक्क्यांनी वाढले आहे. गेले काही महिने रुग्ण आढळण्याचा दर 0.53 टक्के होता. गेल्या महिन्यात ही संख्या सुमारे 700 होती. मार्च महिन्यात आतापर्यंत अनेक प्रकरणे समोर आली आहेत. कोरोनाचा कहर आता चित्रपटसृष्टीतही दिसून येत आहे. याआधी किरण खेर आणि पूजा भट्ट या अभिनेत्रींनी कोरोनाची लागण झाली होती. याचदरम्यान टीव्ही अभिनेत्री माही विजही (Mahhi Vij Covid Positive) कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे.

माही विजला कोरोनाची लागण

छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री माही विजने (Mahhi Vij Covid Positive) नुकतेच सोशल अकाऊंटद्वारे सांगितले की, तिला कोरोना झाला आहे. मी कोविड पॉझिटिव्ह आहे. कोविडचा अहवाल येऊन चार दिवस झाले. मला ताप आणि काही लक्षणे जाणवत होती पण लोक म्हणाले चाचणी करू नको, हा फक्त फ्लू आहे पण मला घरी सर्वांना सुरक्षित ठेवायचे होते आणि घरी मुले आहेत. म्हणून मी कोरोनाची चाचणी केली. बरेच दिवस झाले मला त्रास जाणवत होता. हा कोविड पूर्वीच्या कोविडपेक्षा वाईट आहे आणि मला बराच वेळ श्वास घेता येत नव्हता... 

वाचा:  ...अन् गाळ्यांचे पत्रे फुटले, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा 

कोरोनामुळे मुलांपासून दूर राहते

माही ने पुढे सांगितले की, सध्या ती तिच्या मुलांपासून दूर आहे. मी माझ्या मुलांपासून दूर आहे. ताराला व्हिडिओमध्ये पाहून मला खूप रडू येते. ती म्हणते मला मम्मा हवी आहे. खुशी मला कॉल करते आणि म्हणते मम्मा मी तुला मिस करत आहे. हे पहिल्या कोविडपेक्षा जास्त धोकादायक आहे. मला काही दिवस श्वास घेता येत नव्हता, जो कोविडमध्ये यापूर्वी एवढा त्रास झाला नव्हता. मी एवढेच म्हणेन की सुरक्षित रहा. खूप बेफिकीर राहू नका, कारण आपल्यामुळे आपल्या पालकांना किंवा मुलांना याचा त्रास होऊ नये...

राज कुंद्राही कोव्हिड पॉझिटिव्ह

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा (Shilpa Shetty Husband Raj Kundra) देखील या व्हायरसच्या विळख्यात अडकला आहे. छायाचित्रकार विरल भयानी यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्याने राजचा फोटो पोस्ट करून कोविड पॉझिटिव्ह झाल्याची माहिती दिली आहे. राजकुंद्रा त्याच्या कुटुंबापासून दूर आहे.