Sara Tendulkar Bridal Photoshoot: मास्टर बास्टर सचिन तेंडूलकरची कन्या सारा तेंडूलकर आजकाल आपल्या मोहक अदांनी चाहत्यांना घायाळ करते आहे. सध्या ती अनेक मॅगझीन्ससाठी फोटोशूट करतं आहे. मध्यंतरी तिने अभिनेत्री बन्दिता सान्धू हिच्यासोबत एक हॉट फोटोशूट केलं होतं. तिचे इन्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत. अनेकांनी तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण करावं अशीही इच्छा व्यक्त केली आहे.
मध्यंतरी सारा तेंडूलकरच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, त्या कुठे थांबतायत तोच साराच्या लग्नाच्याही चर्चा सुरू झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा याच चर्चांना उधाण आलं आहे. त्याचं कारणही खास आहे. साराने एका मोठ्या नामवंत ब्रॅन्डसाठी चक्क ब्रायडल शूट केलं आहे. या तिच्या ब्रायडल शूटमुळे सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे तिच्या लग्नाची. या फोटोशूटमुळे सारा आता लग्नबंधनात अडकणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
हे फोटोशूट तिने प्रसिद्ध फॅशन डिझायनर अनिता डोंगरेच्या ब्रॅन्डसाठी केले आहे. अनिता डोंगर हा फॅशन विश्वातला जगप्रसिद्ध ब्रॅन्ड असून या ब्रॅन्डसाठी अनेक मोठमोठ्या कलाकारांनी फोटोशूट केले आहे. या ब्रायडल शूटमध्ये तिने लाल रंगाचा लेहेंगा आणि चोळी घातली आहे. तसेच नववधूप्रमाणे हिऱ्यांचे आणि कुंदनचे दागिने तिने घातले आहेत. नुकतेच हे फोटोशूट साराने इन्टाग्रामवर स्टोरीवरून शेअर केलं आहे. हे फोटोशूट तिने व्होग इंडियासाठी केलं आहे.
याआधी कितीतरी वेळा साराच्या लग्नाविषयी सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात चर्चा या सुरू झाल्या होत्या. तेव्हा सारा तेंडूलकरसह तिच्या वडिलांनी म्हणजे सचिन तेंडूलकरांनीही यावर मौन पाळले होते. पण आता साराचे हे ब्रायडल शूट चाहत्यांसमोर आल्याने तिच्या लग्नाच्या चर्चांना आता चांगलेच खतपाणी मिळाले आहे. सारा तेंडूलकर क्रिकेटर शुभम गिलला डेट करत असल्याची मध्यंतरी चर्चा होती. त्यांचे लग्नही होणार असल्याचे बोललं गेलं.
#AnitaDongre continues to champion craft and social consciousness with her latest line that is heavy on Pichwai, bandhani, Benarasi and gota patti https://t.co/A2yEMmFmft
— VOGUE India (@VOGUEIndia) July 27, 2022
सारा तेंडूलकर ही आपल्या इन्टाग्राम पेजवरून सतत चर्चेत असते. ती आपल्या वेकेशन्सपासून ते पार्टी नाईट्सपर्यंत आपले सर्व खाजगी फोटो इन्टाग्रामवरून शेअर करते. तिने लंडनमधून आपलं शिक्षण पुर्ण केलं आहे.