डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरवर ऐश्वर्याचा हटके अंदाज, बिग बींनी दिली ही प्रतिक्रिया

ऐश्वर्या राय बच्चनचं हे फोटोशूट खूपच व्हायरल होत आहे.

Updated: Jul 29, 2021, 08:20 PM IST
डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरवर ऐश्वर्याचा हटके अंदाज, बिग बींनी दिली ही प्रतिक्रिया

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा हटके लूक समोर आला आहे. प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या 2021 कॅलेंडर फोटोशूटनंतर सगळीकडेच ऐश्वर्या राय बच्चनची चर्चा आहे.

ऐश्वर्या राय बच्चनचं फोटोशूट व्हायरल

ऐश्वर्या राय बच्चनचं हे फोटोशूट खूपच व्हायरल होत आहे. ऐश्वर्याने या फोटोमध्ये जॅकेट घातलं आहे. केसांचा हाई वॉल्यूम करत ऐश्वर्याने हा हटके लूक केला आहे. ऐश्वर्या राय बच्चनच्या या फोटोला फोटोग्राफर डब्बू रत्नानीने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केलं आहे.

ऐश्वर्याच्या आगामी सिनेमाची उत्सुकता 

ऐश्वर्या राय बच्चन लवकरच मणिरत्नम या सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.या सिनेमात ऐश्वर्या राय बच्चन नंदिनी हे पात्र साकारणर आहे.