महिलेने हातावर लावली Divorce Mehandi; सासरचा अत्याचार-व्यथेला अशी मोकळी करुन दिली वाट

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर घटस्फोट, अत्याचाराच्या बातम्या मोठ्या प्रमाणात पाहण्यात येत आहे. अशातच एका मुलीने चक्क हातावर घटस्फोटाची मेंदी काढली आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 17, 2024, 05:48 PM IST
महिलेने हातावर लावली Divorce Mehandi; सासरचा अत्याचार-व्यथेला अशी मोकळी करुन दिली वाट  title=

Woman narrates her failed Marriage Journey : लग्न झालं की, संसार सुरु होतो. अनेकांना वाटतं की, आपला संसार सुखाचा व्हावा. पण प्रत्येकाच्या नशिबात संसार सुख नसतं. अनेकदा संसार मोडायला नवरा-बायको किंवा त्यांचे कुटुंबीय देखील जबाबदार आहेत. एका महिलेने घटस्फोट झाल्यावर आपल्या हातावर मेंदी काढून घटस्फोटाचा प्रवास मांडला आहे. 

या महिलेने आपल्या हातावर मेंहदी काढली आहे. ज्यामध्ये तिने अशा घटना मांडल्या आहेत, ज्यामुळे तिचा घटस्फोट झाला आहे. सध्या या मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. 

महिलेची दुःखद गोष्ट 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Urvashi Vora Sharma (@urvashis_mehandi_and_makeover)

या व्हिडिओमध्ये एका महिलेने तिच्या दोन्ही हातांना मेंदी लावल्याचे तुम्हाला दिसेल. लग्नसमारंभ आणि खास प्रसंगी मेंदी लावली जाते कारण ती उत्सवाचे एक सुंदर प्रतीक आहे, परंतु या महिलेने मेंदीचा एक नवीन ट्रेंड आणला आहे. या महिलेने आपल्या मेंदीचे नाव 'घटस्फोटाची मेंदी' असे ठेवले आहे. या मेंदीमध्ये महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या फोटोंसोबत तिच्या अयशस्वी विवाहाचे फोटो देखील पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ शेअर करून उर्वशी वोहरा शर्माने तिच्या उद्ध्वस्त लग्नाचे कारणही सांगितले आहे.

मेंदीमधून दाखवला अत्याचार 

तुम्हाला दिसेल की, एका महिलेच्या हातावर लावलेल्या मेंदीमध्ये स्त्रीची असहायता, पतीशी भांडणे, झाडू आणि मॉप अशी चित्रे दिसतात. या फोटोत एक महिला पायाखाली दबलेली दिसत आहे. यासोबतच महिलेला एकटेपणा कसा वाटतो याचे चित्रही मेंदीच्या माध्यमातून तिच्या हातावर रेखाटण्यात आले आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून प्रत्येक महिलेने तिच्या हातावर मेंदी लावून सासरच्या लोकांनी तिच्यावर केलेल्या अत्याचाराचे प्रत्येक चित्र रेखाटले आहे. आता हा व्हिडिओ लोकांना विचार करायला भाग पाडत आहे. महिलेच्या या मेंदीवर लोक काय कमेंट करत आहेत, ते वाचणं देखील इंटरेस्टिंग आहे.