मुंबई : एक दिवस आधीच शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्याचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला होता. राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अश्ली-ल फिल्म बनवण्यासाठी आणि स्ट्रीमिंग केल्याबद्दल अटक केली आहे. या सगळ्या दरम्यान आता शमिता शेट्टीने ट्विटरवर एक ट्विट केलं आहे. या ट्विटबरोबर तिने आपले फोटोही शेअर केले आहेत.
शमिता शेट्टी ही शिल्पा शेट्टीची बहीण आहे. तिने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, "कधीकधी तुमची आतमधील ताकद एक मोठी ज्वाला नसते जी प्रत्येकजण पाहू शकतो.. ही फक्त एक छोटीशी ठिणगी आहे जी हळूवारपणे कुजबुजते-" समजलं... करत रहा." तुम्ही हे नियंत्रित करु शकत नाही. की, दूसरे लोक आपली ताकद कशी पाहतात. लोक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ज्या समस्यांमधून जात आहेत. ते त्यांच्या स्वत:च्या लेन्सनुसार इतरांचे जीवन पाहतात... जे की, आपल्याबद्दलसुद्धा नसतात. बस जेवढं होवू शकतं तितकं आपलं काम ईमानदारी आणि प्रेमाने करत रहा."
ही पोस्ट हंगामा 2च्या रिलीजच्यावेळी देखील लिहिली गेली होती
यापूर्वीही 'हंगामा 2' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी शमिता शेट्टीने बहिण शिल्पा शेट्टीसाठी एक खास पोस्ट शेअर केली होती. चित्रपटाच्या पोस्टरबरोबरच तिने शिल्पासाठी एक चिठ्ठी देखील लिहिली.
वेळ निघून जाईल
शमिताने लिहिलं, "ऑल द बेस्ट माय डार्लिंग मुंकी शिल्पा शेट्टी. 14 वर्षानंतर तुझा चित्रपट हंगामा 4D रिलीज झाला आहे. मला माहित आहे की, संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आहे. तुझ्यावर नेहमीच प्रेम आहे. आयुष्यात तु बर्याच गोष्टींचा सामना केला आहेस. तु आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेस. एक गोष्ट मला माहीत आहे. ती म्हणजे तु खूप स्ट्राँग आहेस. ही वेळपण निघून जाईल.