बिग बीनं आपल्या मुलाला अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन ४२ वर्षांचा झालाय. या निमित्तानं त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. 

Updated: Feb 5, 2018, 08:34 PM IST
बिग बीनं आपल्या मुलाला अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन ४२ वर्षांचा झालाय. या निमित्तानं त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. 

यामध्ये सर्वात खास शुभेच्छा ठरल्यात त्या अभिषेकचे वडील बीग बी अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या शुभेच्छा... 

आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारे बिग बी भावूक झालेले दिसले. बिग बी यांनी फोटोंचा कोलाज बनवून वेगळ्या पद्धतीनं अभिषेकला शुभेच्छा दिल्यात. 

बीग बी यांनी यात दोन फोटो शेअर केलेत. एका फोटोत छोटा अभिषेक दिसतोय.... तर दुसऱ्या फोटोत ते स्वत: आपल्या मुलाचा हात पकडून चालताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना बीग बी म्हणतात, 'एक वेळ होती जेव्हा वडील मुलाचा हात हातात घेऊन चालत होते... आता मुलगा वडिलांचा हात हातात घेऊन चालवतो'

सोबतच, अभिषेकच्या फुटबॉल टीम चेन्नईयन एफसीनंही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. 'हॅप्पी बर्थडे बॉस' म्हणत त्यांनी एक व्हिडिओही आपल्या ऑफिशिअल ट्विटर हॅन्डलवर पोस्ट केलाय.