सलमानच्या या हिरोईनचा खास अंदाज...

सलमान खान सध्या रेस 3 चे शूटिंग करत आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 16, 2018, 05:01 PM IST
सलमानच्या या हिरोईनचा खास अंदाज... title=

नवी दिल्ली : सलमान खान सध्या रेस 3 चे शूटिंग करत आहे. हे शूटिंग सध्या बॅंकॉक येथे सुरू आहे. यादरम्यान सलमानच्या हिरोईनचा एक अनोखा अंदाज पाहायला मिळाला. सलमानसोबत जय हो चित्रपटात झळकलेली हिरोईन डेजी शहाने एक खास फोटो शेअर केला आहे. ज्यात ती वाघाच्या बछड्याला बाटलीने दूध पाजत आहे. डेझी शहा सलमानसोबत रेस 3 मध्येही झळकणार आहे.

पहा डेझी शहाचा हा खास फोटो...

 

Tiger Chota baby hai 

A post shared by Daisy (@shahdaisy) on

बॅंकॉकच्या भाषेत नमस्कार बोलत सलमानने एक व्हिडिओ शेअर केला.

रेमोचे दिग्दर्शन

रेस 3 चे दिग्दर्शन रेमो डिसूजा करत आहेत. रेमोने फालतू या चित्रपटातून आपल्या दिग्दर्शन करिअरला सुरूवात केली. त्यानंतर रेमोचा एबीसीडी हा चित्रपट लोकांच्या चांगलाचा पसंतीस उतरला. त्यानंतरही रेमोने काही चित्रपटांचे दिग्दर्शन केले. आता लवकरच त्याचा रेस 3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

ही आहे चित्रपटाची कास्ट

२००८ मध्ये आलेल्या रेस चित्रपट सिरीजचा हा तिसरा चित्रपट आहे. यात जॅकलिन आणि अनिल कपूर सोडल्यास कलाकारांची संपूर्ण नवी टीम आहे. या चित्रपटात सलमान खान आणि अनिल कपूरसोबत बॉबी देओल, साकिब सलीम, डेझी शहा आणि जॅकलिन फर्नांडिस आहे.