'दंगल' फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, लोकांना विनंती करत म्हणाली...

Dangal Fame Actress Father Death : 'दंगल' फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन... सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली...

दिक्षा पाटील | Updated: May 29, 2024, 12:50 PM IST
'दंगल' फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, लोकांना विनंती करत म्हणाली... title=
(Photo Credit : Social Media)

Zaira Wasim Father Death : 'दंगल' आणि 'सीक्रेट सुपरस्टार' सारख्या चित्रपटांमधून लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री झायरा वसीमवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. याची माहिती स्वत: झायरानं याविषयी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. तिनं तिच्या चाहत्यांना प्रार्थना केली की तिच्या वडिलांना प्रार्थना करताना नक्की आठवा. 

झायरानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलं की 'माझे वडील जाहिद वसीम यांचे निधन झाले आहे. मी सगळ्यांना विनंती करते की तुमच्या प्रार्थनांमध्ये त्यांची आठवण ठेवा आणि त्यांच्यासाठी अल्लाहकडे माफी मागा. प्रार्थना करा की अल्लाह त्यांच्या सगळ्या कमी माफ करतील, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, त्यांना कोणत्याही गोष्टीच्या शिक्षेपासून वाचवा, त्यांना परलोकात आराम दे आणि त्यांना स्वर्गात सर्वोच्च स्थान आणि क्षमा दे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

याशिवाय झायरानं तिच्या वडिलांसोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे. या फोटसोबत झायरानं एक भावूक नोट देखील शेअर केली आहे. झायरानं लिहिलं की खरंतर डोळ्यातून अश्रू वाहतात आणि मन दुखावतं, पण आपण ते बोलणार नाही जे आपल्या प्रभूला आवडते. माझे वडील जाहिद वसीम यांचे निधन झाले आहे. कृपया त्यांना आपल्या प्रार्थनेत लक्षात ठेवा आणि अल्लाहला त्याच्या उणीवा माफ करण्यास सांगा, त्यांच्या आत्म्याला शांती दे असं सांगा, त्यांना त्याच्या शिक्षेपासून वाचवा आणि त्यांचा पुढचा प्रवास सुलभ करा. त्यांना जन्नत आणि मघिराचा उच्च दर्जा दिला पाहिजे. खरंच, आम्ही अल्लाहचे आभारी आहोत आणि आपण त्यांच्याचकडे जाणार आहोत.

dangal fame actress Zaira Wasim Father s Death shared post

हेही वाचा : ऑरीनं दाखवली अनंत अंबानीच्या क्रुज पार्टीची झलक, लग्जरी बेडरूम ते इटलीचे Beach

झायरा वसीमला 64 व्या फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट सपोर्टिंग अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता आणि तिच्या वडिलांना याविषयी माहिती नव्हती. अर्थात त्यांना हा पुरस्कार कोणता असतो हे माहिती नव्हतं. झायरानं त्यांना 2 तास त्या पुरस्काराचं महत्त्व सांगितलं आणि त्यांची अशी प्रतिक्रिया होती की हा पुरस्कार कोणीही मिळवू शकतं, त्यात काही मोठी गोष्ट नाही. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत झायरानं हा खुलासा केला होता. पण जेव्हा तिला हा पुरस्कार मिळाला तेव्हा तिच्या आई-वडिलांना तिच्यावर गर्व झाला होता.