व्हिडिओ: बिग बींच्या गाण्यावर मायलेकींचा क्यूट डान्स; तुम्ही पाहिला?

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पहाल तर, तुम्हालाही या क्यूट मुलीच्या अनोख्या अंदाजाची कल्पना येईल.

Updated: May 19, 2018, 03:52 PM IST
व्हिडिओ: बिग बींच्या गाण्यावर मायलेकींचा क्यूट डान्स; तुम्ही पाहिला? title=

मुंबई: काही गाणी अशी असतात जी ऐकताच व्यक्तीच्या अंगात असलेला डान्सर जागतो. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या शावा-शावा गाण्याचेही काहीसे असेच आहे. या गाण्याच्या स्टेप्सही काहीशा अशा आहेत की, ज्या तुम्हाला सहजगत्या थिरकण्यास मदत करतात. विशेष म्हणजे हे गाणे तेव्हा आणखीच सुंदर वाटते जेव्हा एखादी क्यूट मुलगी आपल्या आईसोबत त्यावर डान्स करते. 

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पहाल तर, तुम्हालाही या क्यूट मुलीच्या अनोख्या अंदाजाची कल्पना येईल. या मुलीचे नाव इलियाना असे असल्याचे समजत आहे. Fusion Beats Dance with Francesca नावाच्या युट्यूब चॅनलवर हा व्हडिओ अपलोड करण्यात आला आहे.