सलमानला 'गोविंदासह काम करण्याची इच्छा नव्हती; डेव्हिड धवन यांचा खुलासा, 'मी म्हटलं काय करतोस हा...'

बॉलिवूडमध्ये 90 चं दशक गाजवणारे अभिनेता गोविंदा (Govinda) आणि सलमान खान (Salman Khan) 'पार्टनर' (Partner) चित्रपटात एकत्र झळकले होते. त्यांची ही जोडी प्रेक्षकांनाही प्रचंड आवडली होती. पण या चित्रपटानंतर दोघे एकत्र दिसले नाहीत.   

शिवराज यादव | Updated: Jul 31, 2024, 04:03 PM IST
सलमानला 'गोविंदासह काम करण्याची इच्छा नव्हती; डेव्हिड धवन यांचा खुलासा, 'मी म्हटलं काय करतोस हा...' title=

बॉलिवूडमध्ये 90 चं दशक गाजवणारे अभिनेता गोविंदा (Govinda) आणि सलमान खान (Salman Khan) 'पार्टनर' (Partner) चित्रपटात एकत्र झळकले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. दोघांची जोडी प्रेक्षकांनाही प्रचंड आवडली होती. पण या चित्रपटानंतर ही जोडी एकत्रित झळकली नव्हती. दरम्यान या चित्रपटाचे दिग्दर्शक डेव्हिन धवन (David Dhawan) यांनी सलमान या चित्रपटात गोविंदासह काम करण्यासाठी फार उत्सुक नव्हता असा खुलासा केला आहे. अरबाज खानच्या 'द इनविन्सिबल' मध्ये डेव्हिड धवन यांनी हजेरी लावली होती. 

मुलाखतीत डेव्हिड धवन यांनी सांगितलं की, "मी सोहेल खानला आपण सलमान खान आणि गोविंदाला एकत्रित आणून चित्रपट करु असं सुचवलं होतं. त्यावर सोहेल खानही तयार झाला होता. जबरदस्त कल्पना आहे असं त्याचं म्हणणं होतं. पण सलमान खान यासाठी फार उत्साही नव्हता".

"मी सोहेल खानला विचारलं की, आपण गोविंद आणि सलमान भाईला एकत्रित आणू शकतो का? सोहेलने त्यावर हो म्हटलं. पण जेव्हा मी सलमानला सांगितलं, तेव्हा तो फार उत्साही नव्हता. मी त्याला म्हटलं, चल यार, हे करुयाच. हा चित्रपट फार मोठा हिट असेल" यानंतर बँकॉकमध्ये चित्रपटाचं शुटिंग सुरु असताना सलमान मला म्हणाला, 'डेव्हिड या...याच्याशी भांडून काही फायदा नाही'. नंतर त्याने सगळा चित्रपट पूर्ण केला आणि तो फार चांगला झाला असंही त्यांनी सांगितलं. 

डेव्हिड धवन आणि गोविंदा यांची जोडी 1990 च्या दशकात सुपरहिट ठरली होती. दोघांनी मिळून जवळपास 17 हिट चित्रपट केले. डेव्हिड धवन याचं म्हणणं आहे की, फक्त तेच गोविंदासोबत सर्वोत्तम काम करू शकतात. ते म्हणाले, 'फक्त मीच त्यांना सांभाळू शकलो. तो नेहमीच माझा खूप आदर करत असे". गोविंदा सेटवर उशिरा यायचा का? असं विचारलं असता ते म्हणाले, "माझे काम नेहमीच पूर्ण होत असे".

डेव्हिड यांनी पुढे सांगितलं की, अनिल कपूर 'दीवाना मस्ताना' चित्रपटाच्या सेटवर थोडा रागावला होता. अनिलला वाटत होतं की, त्याच्या सुटीच्या काळात गोविंदा आणि डेव्हिडने चित्रपटाचे बरेच शूटिंग केले. डेव्हिड धवन आणि गोविंदा यांनी अनेक हिट चित्रपट एकत्र केले आहेत. यामध्ये 'राजा बाबू', 'कुली नंबर 1', 'हिरो नंबर 1', 'आँखे', 'साजन चले ससुराल' अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x