Debina Bonnerjee Rampwalk: हल्ली रॅम्पवॉक करताना आपल्या तान्ह्या बाळाला घेत आपली अदाकारी आत्मविश्वासानं दाखवण्याचा सध्या एक वेगळा फंडा तयार झाला आहे. अशा अनेक सुप्रसिद्ध मॉडेल्स आहेत ज्यांनी गरोदर असताना किंवा आपल्या तान्ह्या बाळासह रॅम्पवॉक केला आहे. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा रंगलेली असते. अभिनेत्री करीना कपूर, नेहा धुपिया यांनी देखील गरोदर असताना रॅम्पवॉक केला होता. त्यामुळे त्यांची जोरात चर्चाही रंगलेली होती. आता लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री देबिना बॅनर्जी हिनंही आपल्या मुलींसोबतही रॅम्पवॉक केला आहे. त्यामुळे तिची सध्या जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. सध्या तिच्या या रॅम्पवॉकचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आपल्या मुलींसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. आपल्या मुलींसोबत ती विविध अॅक्टिव्हिटीज करताना दिसते.
सोशल मीडियावरही तिनं आपल्या प्रेग्नन्सीबद्दल आणि आपल्या मुलींच्या संगोपनाबद्दल वेळोवेळी मत मांडलं आहे. त्यातून ती अनेकदा सोशल मीडियावरून व्यक्त होताना दिसते. तिनं आपल्या मुलींसोबत केलेला हा रॅम्पवॉक प्रचंड लोकप्रिय झाला आहे. त्यामुळे सध्या तिची प्रचंड चर्चा आहे. तिच्या मोठ्या मुलीचा जन्म हा IVF टेक्नोलॉजीच्या अंतर्गत झाला आहे. तर तिच्या दुसऱ्या मुलीचा जन्म हा नैसर्गिक आहे. लग्नाच्या 11 वर्षांनंतर देबिना बॅनर्जी आणि गुरमित चौधरी यांना दोन मुली झाल्या आहेत. आपल्या या प्रवासाविषयीही तिनं मोकळेपणानं आपलं मतं मांडलं आहे. सध्या तिनं आपल्या गोंडस मुलींसोबत केलेला हा रॅम्पवॉक विशेष चर्चेत आहे.
हेही वाचा : ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफरनं वाईट वागणूक दिल्यावरही शेफाली शहा 'त्याची दया येते पण..' असं का म्हणाली?
यावेळी आईसोबत त्या दोघी ट्विनिंग करताना दिसल्या होत्या. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली होती. यावेळी रेड आणि ऑरेंज ड्रेसमध्ये आईसोबत त्या दोघी ट्विनिंग करताना दिसल्या. यावेळी त्यांनी सुंदर असा ड्रेस परिधान केला होता आणि डोक्यावर हेअरबॅण्डही घातला होता. रॅम्पवरील त्या दोघींची मस्ती पाहून सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली होती. त्यामुळे त्यांची जोरात चर्चाही रंगलेली आहे. यावेळी देबिनानं डीप नेक हाय स्लिट ड्रेस परिधान केला होता. यावेळी त्यांनी आईसोबत डान्सही केला होता. त्यात नंतर मग ते मस्त डान्स करतात आणि मग लियानाला सोडून देबिना पुढे जाते परंतु मग तिला पुढे नेत गुरमितही तिच्या मागे मागे येतो.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे.
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.