ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफरनं वाईट वागणूक दिल्यावरही शेफाली शहा 'त्याची दया येते पण..' असं का म्हणाली?

Shefali Shah Cinematographer Experience: आपल्या कधी कोणाचा कसा अनुभव येईल हे आपण सांगू शकत नाही. कोण कितीही वरिष्ठ असलं तरीसुद्धा त्यांच्याबद्दल आपण काहीच सांगू शकत नाही. सध्या लोकप्रिय अभिनेत्री शेफाली शहा हिनं देखील आपला असाच एक भयावह अनुभव शेअर केला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 31, 2023, 04:44 PM IST
ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफरनं वाईट वागणूक दिल्यावरही शेफाली शहा 'त्याची दया येते पण..' असं का म्हणाली? title=
shefali shah shares her bad experience with cinematographer latest entertainment news in marathi

Shefali Shah Cinematographer Experience: शेफाली शहा ही आपल्या आगाळ्यावेगळ्या अभिनयासाठी ओळखली जाते. तिच्या अभिनयाची प्रचंड चर्चा रंगलेली असते. सध्या ओटीटीवरील ती सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेकदा ती विविध विषयांवर फार मोकळेपणानं बोलताना दिसते. काही दिवसांपुर्वी तिनं स्ट्रीट हरॅसमेंटवर आपलं मतं व्यक्त करत आपल्याला आलेला कटू अनुभव सांगितला होता. बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय चित्रपटांमधून तिनं वेगवेगळ्या भुमिका केल्या आहेत. परंतु ओटीटीवरील विविध वेबमालिका आणि चित्रपटांच्या भुमिकांमुळे तिला फार लोकप्रियता मिळाली होती. आता तिच्या एका वक्तव्याची बरीच चर्चा आहे. यावेळी एका सिनेमॅटोग्राफरचा अनुभव शेअर केला आहे. 

शेफाली शहा हिनं यावेळी इंडियन एक्सप्रेस ग्रुपच्या 'एक्सप्रस अड्डा'मध्ये सहभाग दर्शवला होता. यावेळी तिनं आपला एक अनुभव शेअर केला आहे. त्यामुळे तिची चर्चा रंगलेली आहे.

शेफालीनं यावेळी सांगितलं की दोन वर्षांपुर्वी ती एक चित्रपट करत होती. त्या चित्रपटाचे डीओपी म्हणजे सिनेमॅटोग्राफर हे खूप सिनिअर होते. हे इतके मोठे होते की सर्वच जण त्यांचा सन्मान करत होते. यावेळी यांच्यासोबतचा एक अनुभव सांगताना ती म्हणाली की, ''या चित्रपटाचे दिग्दर्शक हे नवीन होते. तेव्हा दिग्दर्शकांनी डीओपीकडे एक इशारा करत सांगितले की या एक स्टार आहेत. त्यांचा एक शॉट घ्यायचा आहे.''

''तेव्हा हा डीओपी इतका भडकला की सर्वांसमोर त्यानं जोरात दिग्दर्शकांना प्रत्यूत्तर दिले आणि म्हणाला की आता काय सगळ्यांसोबत शॉट घेत बसायचा का? तेव्हा मी सांगून शकत नाही की मला किती भयानक वाटले होते. तेव्हा त्याच्याबद्दल माझाप्रती जो काही सन्मान होतो तो पुर्णपणे निघून गेला होता. परंतु जेव्हा मला तो दिसतो किंवा तो भेटतो तेव्हा मला त्याची फारच दया येते. परंतु वास्तवात मात्र मला त्या माणसाची फारच चीड येते.'' अशी आठवण तिनं यावेळी सांगितली. 
 
यापुढे ती म्हणाली की, ''त्या डीओपीनं ते जे काही केलं हे पाहून त्याला जाणवलं की त्यानं ते फारचं चुकीचे केले. त्यांना तो सीन परत शूट करावा लागला होता.'' असं तिनं सांगितले. शेफाली शहाचा नुकताच 'नियत' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता तिचा 'दिल्ली क्राईम 2' हा प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. मागील वर्षी तिचे 'डार्लिंग्स' आणि 'जलसा' असे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाल होते. सोबतच 'ह्यूमन' ही वेबसिरिजही प्रचंड गाजली होती.