'रामायण' फेम दीपिका चिखलिया झळकणार नव्या भूमिकेत

दीपिका चिखलिया यांनी त्यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे.     

Updated: May 8, 2020, 01:32 PM IST
'रामायण' फेम दीपिका चिखलिया झळकणार नव्या भूमिकेत  title=

मुंबई : रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेच्या मध्यमातून प्रसिद्धीझोतात अलेली अभिनेत्री दीपिका चिखलिया पुन्हा एकदा मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्या स्वातंत्र्यसैनिक सरोजिनी नायडू यांच्या बायोपिकमध्ये सरोजिनी नायडू यांची व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहेत. खुद्द दीपिका यांनी चित्रपटाचा पहिला पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.  स्वातंत्र्यसैनिक त्याचप्रमाणे भारताची कोकिळा म्हणून लौकीक मिळवलेल्या सरोजीनी नायडू  ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य समरात आपले महत्वपुर्ण योगदान दिले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#sarojini#sarojininaudu .....1st look #poster......#starplus #ramayan #730 #everyday

A post shared by Dipika (@dipikachikhliatopiwala) on

सध्या दीपिका चिखलिया यांच्या आगामी चित्रपटचा पोस्टर तुफान व्हायरल होत आहे. दीपिका चिखलिया यांनी पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट करत करत कॅप्शनमध्ये, 'सरोजिनी नायडू'यांच्या आयुष्यातील न उलगडलेले पैलू' असं लिहिलं आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक आकाश नायक आणि धिरज मिश्रायांच्या खांद्यावर आहे. 

सरोजिनी नायडू एक उत्तम राजकारणी आणि महान स्वातंत्र्य सेनानी होत्या या शिवाय त्या एक फेमिनिस्ट, कवयित्री, आणि आपल्या काळातील एक महान वक्त्या देखील होत्या.