'गहराइया' सिनेमातील एका सीनसाठी दीपिकाने दिले 48 रिटेक

दीपिका पादुकोणचा किसिंग सीन वादाच्या भोवऱ्यात  

Updated: Feb 10, 2022, 11:50 AM IST
'गहराइया' सिनेमातील एका सीनसाठी दीपिकाने दिले 48 रिटेक  title=

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोन सध्या 'गहराइया' सिनेमामुळे तुफान चर्चेत आहे. आतापर्यंत कोणत्याही सिनेमात दीपिकाने एवढे बोल्ड सीन दिले नसतील तेवढे 'गहराइया' सिनेमात दिले आहेत. सीनेमातील एका सीनसाठी दीपिकाला 48 रिटेक द्यावे लागले. फक्त दीपिकाला नाही तर दिग्दर्शक शकुन बत्रा यांनी अन्य कलाकारांना देखील एका सीनसाठी अनेक टेक द्यायला लावले. 

एका मुलाखतीत दीपिका म्हणाली, 'मी अनेक दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. पण शबुन बत्रा यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव वेगळा होता. सिनेमात त्यांनी फक्त एका चालीसाठी 48 टेक घेतले.' 

दरम्यान, सिनेमातील काही व्हिडीओ सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ज्यामुळे दीपिकाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. बोल्ड सीनमुळे ट्रोल करणाऱ्यांना दीपिकाने सडेतोड उत्तर दिलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एका मुलाखती दरम्यान दीपिका पती रणवीरसोबत असलेल्या नात्यावर बोलत होती. एवढंच नाही सोशल मीडियावर ज्यामुळे ट्रोल होत आहे, त्याबद्दल देखील तिने मुलाखती दरम्यान सांगितलं आहे. 

'गहराइया' सिनेमात किसिंग सीन देण्याआधी तू रणवीरचा परवानगी घेतली होती का? असा प्रश्न दीपिकाला सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला जात आहे. यावर उत्तर देताना दीपिका म्हणाली, 'असं करणं म्हणजे मुर्खपणाचं लक्षण आहे... माझ्या कामावर रणवीरला गर्व असल्याचं देखील दीपिका यावेळी म्हणाली. 

'गहराइया' सिनेमात दीपिकाने  अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत अधिक बोल्ड आणि इंटिमेट सीन दिले आहेत. सिनेमात दीपिका आणि सिद्धांत शिवाय आभिनेत्री अनन्या पांडे, अभिनेता धैर्य करवा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 11 फेब्रुवारी रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.