Bikini Controversy : दीपिका पदूकोणच्या बिकीनीची किंमत ऐकूण कॉन्ट्रोवर्सी विसराल, जाणून घ्या

Deepika Bikini Controversy : बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान (shahrukh khan) याचा आगामी 'पठान' चित्रपटातील 'बेशरम रंग' (Beshram rang) हे गाणे नुकतेच रिलीज झाले. या चित्रपटात दीपिकाचा लुक पाहून सर्वंच आश्चर्यचकीत झाले होते. दीपिका (Deepika Padukone) खुपच बोल्ड अवतारात दिसत होती. 

Updated: Dec 16, 2022, 09:45 PM IST
Bikini Controversy : दीपिका पदूकोणच्या बिकीनीची किंमत ऐकूण कॉन्ट्रोवर्सी विसराल, जाणून घ्या title=

Deepika Bikini Controversy : पठाण (Pathaan) चित्रपटाच्या बेशरम रंग (Beshram rang) गाण्यातील दिपिकाच्या (Deepika Padukone) भगव्या बिकिनीवरून सुरु झालेला वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यात आता भाजपच्या मंत्र्यांसह विश्व हिंदू परिषदेने (विहिप) तीव्र विरोध दर्शवला असून त्यात बदल करण्याची मागणी केली आहे. असे असतानाच त्या बिकीनीची आता किंमत समोर आली आहे. ही किंमत ऐकूण तुम्ही कॉन्ट्रोवर्सी विसरुन जाल.  

बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान (shahrukh khan) याचा आगामी 'पठान' चित्रपटातील 'बेशरम रंग' (Beshram rang) हे गाणे नुकतेच रिलीज झाले. या चित्रपटात दीपिकाचा लुक पाहून सर्वंच आश्चर्यचकीत झाले होते. दीपिका (Deepika Padukone) खुपच बोल्ड अवतारात दिसत होती. या गाण्यात तिने भगव्या कलरची बिकीनी परिधान केली होती. या भगव्या रंगावरून मोठा वाद पेटला आहे. या भगव्या बिकीनीसह तिने गाण्यात गोल्डन बिकीनी (Golden Bikini) देखील परिधान केली आहे. या गोल्डन बिकीनीचे आता किंमत समोर आली आहे.    

हे ही वाचा : दीपिका पदुकोणच्या बिकिनी वादात खासदार Nussrat Jahan ची उडी, म्हणाली...

दीपिकाचा स्टायलिस्ट कोण?

दीपिका पदुकोण (Deepika Padukone) बेशरम रंग गाण्याच्या व्हिडिओमध्ये सोन्याच्या वन-पीस स्विमसूटमध्ये दिसत आहे. या लुकमध्ये ती खुपच बोल्ड दिसत आहे. गोल्डन कलरची (Golden Bikini)  मोनोकिनी परिधान करून दीपिकाने चाहत्यांना घायाळ केले आहे. दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानची स्टायलिस्ट शालीना नाथानीने त्यांचे गाण्यातले कपडे तयार केले आहेत.दीपिकाची ही मोनोकिनी मिनिमलिस्ट पण स्टेटमेंट मेकिंग अॅक्सेसरीज आणि मेकअपसह स्टाइल केली आहे.

बिकीनीची किंमत किती?

दीपिका (Deepika Padukone) डिझायनर नॉर्मा कमालीच्या नाविन्यपूर्ण कपड्यांचे लेबल शेल्व्हजमधील सोन्याच्या वन-पीस स्विमसूटमध्ये कॅमेऱ्यासाठी पोज देताना दिसत आहे. या स्विमसूटची किंमत नॉर्मा कमालीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे आणि त्याला गोल्ड फॉइल शेडमध्ये मारिसा असे म्हणतात. या बिकीनीची किंमत ₹120002.72 (USD 145) आहे.
 
दरम्यान शाहरुख खान (shahrukh khan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) व्यतिरिक्त पठाण चित्रपटात जॉन अब्राहम देखील आहे. हा चित्रपट येत्या 25 जानेवारी 2023 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये रिलीज होणार आहे.या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.