Nussrat Jahan on Bikini Controversy : पठाण (Pathaan) चित्रपटाच्या बेशरम रंग (Beshram rang) गाण्यातील दिपिकाच्या भगव्या बिकिनीवरून सुरु झालेला वाद थमण्याचे नाव घेत नाही आहे. हा वाद वाढतच चालला आहे. त्यात या वादावर अनेक मंत्री, अभिनेते आणि अभिनेत्री प्रतिक्रिया देत आहेत.अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहाँ (Nussrat Jahan) यांनी देखील या वादात उडी घेतली आहे. या वादावर त्या काय म्हणाल्या आहेत, हे जाणून घेऊयात.
तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहाँ (Nussrat Jahan) यांनी बिकीनी वादावर (Bikini Controversy) प्रतिक्रिया दिली आहे. तिने एका मुलाखतीत चित्रपटाच्या वादावर भाष्य केले आहे.ही कोणत्याही विचारधारेची गोष्ट नाही आहे. त्याऐवजी एका पक्षाला घेऊन आहे, जे काहीही करत आहे, असे म्हणत तिने भाजपला टोला लगावला. ती पुढे म्हणाली की, आता ते संस्कृतीबद्दल आणि बिकिनी घालणाऱ्या महिलांबद्दल बोलताना दिसत आहेत.
आधी हिजाब आता बिकिनी...या सगळ्याची समस्या आहे, ते आजच्या भारतातील महिलांना काय घालावे? काय खावे? कसे बोलावे? कसे चालावे? शाळेत काय शिकावे? टीव्हीवर काय पहावे ? हे सांगत आहेत. या सर्व गोष्टीतून ते महिलांवर नियंत्रण ठेवत असल्याचा आरोप नुसरत जहाँने (Nussrat Jahan) भाजपवर केला आहे.
दरम्यान पठाण (Pathaan) चित्रपटातीलील बेशरम रंग (Beshram rang) या गाण्यात भगव्या रंगाची बिकिनी घालणे दीपिकाला चांगलेच महागात पडले. यावर भाजपसह अनेक संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे. भाजपच्या मंत्र्यांसह विश्व हिंदू परिषदेने (विहिप) तीव्र विरोध दर्शवला असून त्यात बदल करण्याची मागणी केली आहे. तर इतर पक्षांचे नेते आता चित्रपट आणि चित्रपटातील कलाकारांना पाठिंबा देताना दिसत आहेत.त्यामुळे आता हा वाद कुठे शमतो, हे पाहावे लागणार आहे.