close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

यासाठी दीपिका-रणबीर पुन्हा आले एकत्र!

बॉलिवूडचा अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण पुन्हा एकत्र आले आहेत.

Updated: Apr 20, 2018, 04:33 PM IST
यासाठी दीपिका-रणबीर पुन्हा आले एकत्र!

मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण पुन्हा एकत्र आले आहेत. खाजगी आयुष्यात नाही तर प्रेक्षकांची ही आवडती जोडी कामानिमित्त एकत्र येणार आहे. खाजगी आयुष्यात वेगळे झाल्यानंतर ही जोडी तमाशा सिनेमात एकत्र पाहायला मिळाली होती. आता त्या दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहुल चाहते सुखावणार आहेत.

यासाठी आले पुन्हा एकत्र

नुकत्याच झालेल्या मिजवान फॅशन वीकमध्ये मनीष मल्होत्रासाठी दीपिका-रणबीरने रॅम्प वॉक केला. या शोमध्ये दोघे हातात हात घालून रॅम्प वॉक करताना दिसले. दोघांचे ब्रेकअप झाले असले तरी त्यांची मैत्री अजूनही कायम आहे. फॅशन शोमधील दोघांचे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. चाहत्यांनी तर फोटोजवर लाईक्सचा पाऊस पाडला.

दीपिका-रणबीरचा जबरदस्त लूक

रॅम्प वॉक करताना दीपिकाने सुंदर ग्लिटरी गाऊन घातला होता तर रणबीर काळ्या रंगाच्या शेरवानीत दिसला. 

 

Showstopper #ranbirkapoor #deepikapadukone @deepikapadukone @neetu54

A post shared by Ranbir Kapoor (@ranbir_kapoor___) on

या कलाकारांनीही लावली हजेरी

या फॅशन शोमध्ये शबाना आझमी, मौनी रॉय, नीतू कपूर, जावेद अख्तर, डेझी शहा, पुलकीत सम्राट आणि यामी गौतम हे कलाकार सहभागी झाले होते. 

 

 

A post shared by Ranbir Kapoor (@ranbirkapoor) on