बो मोंड इमारत आगीनंतर दीपिका पदुकोणचं ट्विट

पाहा काय म्हणाली दीपिका पदुकोण

Updated: Jun 13, 2018, 07:20 PM IST

मुंबई : मुंबईत प्रभादेवीतल्या बो मोंड या ३३ माळ्यांच्या रहिवासी इमारतीला लागलेली आग आटोक्यात आली आहे. चार तासांच्या प्रयत्नानंतर अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांना ही आग विझवण्यात यश आलं. दरम्यान आग विझवताना दोन अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले आहेत. आग लागलेल्या इमारतीच्या २६ व्या मजल्यावर अभिनेत्री दीपिका पदुकोणचंही घर होतं. त्यामुळे सिनेप्रेमींमध्ये आणि तिच्या चाहत्यांमध्येही चिंतेचं वातवरण होतं. मात्र आपण सुरक्षित असल्याचं ट्विट दीपिकाने केलंय.