दीपिकाने हॉटेलमधून चोरल्या शॅम्पूच्या बॉटल? बेस्ट फ्रेंडचा खुलासा

अभिनेत्री दीपिका पदुकोण बॉलिवूडमधील सर्वात आघाडीची अभिनेत्री आहे. 

Updated: Aug 2, 2019, 02:49 PM IST
दीपिकाने हॉटेलमधून चोरल्या शॅम्पूच्या बॉटल? बेस्ट फ्रेंडचा खुलासा

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण बॉलिवूडमधील सर्वात आघाडीची अभिनेत्री आहे. दीपिकाने एकामागोमाग एक सुपरहिट चित्रपट देत बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण करियरच्या इतक्या उंचीवर पोहचलेली दीपिका खऱ्या आयुष्यात कशी आहे? याबाबत चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. मात्र नुकतंच दीपिकाच्या एका बेस्ट फ्रेंडने दीपिकाबाबत खुलासा केला आहे. यातून दीपिका किती खोडकर, मजेशीर असल्याचंही समोर येतंय. 

फ्रेंडशिप डेच्या एक दिवस आधी दीपिकाची बेस्ट फ्रेंड स्नेहा रामचंदरने एक नोट शेअर करत सरप्राइज दिलं आहे. या नोटमधून तिने दीपिकाबाबत काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. दीपिका केवळ एक चांगली अभिनेत्रीच नाही तर एक चांगली मैत्रिण असल्याचं तिने म्हटलंय. याशिवाय स्नेहा रामचंदरने तिच्या पोस्टमध्ये, दीपिका तिच्या प्रत्येक प्रवासावेळी तेथील हॉटेलमधून शॅम्पूची बॉटल उचलत असल्याचाही किस्सा सांगितलाय. 

दीपिका पदुकोण लग्नानंतर पहिल्यांदा मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय दीपिका रणवीरसोबत '83' चित्रपटात भूमिका साकारणार आहे. '83' चित्रपट वर्ल्ड कप 1983 वर आधारित आहे. या चित्रपटात रणवीर कपिल देव यांची प्रमुख भूमिका साकारणार आहे. तर दीपिका रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीच्या भूमिकेतून  कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे.