आतापर्यंत ३ अरब लोकांनी पाहिलंय हे गाणं, यूट्यूबवर या गाण्याचा धमाका (व्हिडिओ)

म्युझिकमध्ये अशी जादू आहे ज्यामुळे डोकं ताजतवाणं राहतं. म्युझिकचे असे काही सूर असतात जे ऎकणा-यांच्या मनाचा ताबा घेतात. अशावेळी भाषेची कोणतीही बंधने नसतात.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Aug 7, 2017, 08:30 PM IST
आतापर्यंत ३ अरब लोकांनी पाहिलंय हे गाणं, यूट्यूबवर या गाण्याचा धमाका (व्हिडिओ) title=

मुंबई : म्युझिकमध्ये अशी जादू आहे ज्यामुळे डोकं ताजतवाणं राहतं. म्युझिकचे असे काही सूर असतात जे ऎकणा-यांच्या मनाचा ताबा घेतात. अशावेळी भाषेची कोणतीही बंधने नसतात.

गेल्या काही दिवसांपासून असंच एक गाणं यूट्य़ूबवर धुमाकूळ घालत आहे. पोर्ट रिकोचा पॉप सिंगर लुईस फॉन्सी आणि डॅडी यांकी यांचं ‘डेस्पासितो’ हे गाणं चांगलंच चर्चेत आलं आहे. या गाण्याने अल्पावधीतच एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. 

‘डेस्तासितो’ हे गाणं यूट्यूबवर आतापर्यंतचं सर्वात जास्त पहिलं गेलेलं गाणं ठरलं आहे. आतापर्यंत या गाण्याला तब्बल ३ अरब पेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. या महिन्याच्या सुरूवातीला विज खलीफाचं ‘सी यू अगेन’ हे गाणं टॉपवर होतं. त्याआधी ‘गंगनम स्टाईल’ हे गाणं गाजलं. आता ‘डिस्पासितो’ या गाण्याने सर्वांना मागे टाकत पहिल्या क्रमांकावर जागा मिळवली आहे.  

‘डेस्पासितो’ चा अर्थ ‘हळू हळू’ असा होतो. भारतातही हे गाणं पसंत केलं जात आहे. हे एक स्पॅनिश गाणं असून याचे बोल जरी लोकांना कळत नसले तरी या गाण्याचं म्युझिक अनेकांच्या मनात घर करून आहे. या गाण्याची चाल अनेकांना भुरळ घालत आहे. एक सामान्य रॅप स्टाईल गाणं असूनही ते खूप जास्त गाजत आहे.