'जय मल्हार'नंतर देवदत्त नागे आता 'डॉक्टर डॉन'च्या रुपात

आता तोडायचं  नाही  जोडायचं

Updated: Jan 24, 2020, 07:17 PM IST
'जय मल्हार'नंतर देवदत्त नागे आता 'डॉक्टर डॉन'च्या रुपात

मुंबई : झी मराठीवरील 'जय मल्हार' मालिकेतून प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळवलेला अभिनेता देवदत्त नागे सध्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपल्या अभिनयाने देवदत्त नागे यांनी छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील प्रेक्षकांच मनोरंजन केलं आहे. आता देवदत्त नागे झी युवा वाहिनीच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'झी युवा' वाहिनी, 'डॉक्टर डॉन' नावाची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येते आहे. ही मालिका हलकीफुलकी आणि विनोदी धाटणीची असणार आहे. या मालिकेतून, अभिनेता देवदत्त नागे छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. तो एका निराळ्या भूमिकेत आणि खास लुकमध्ये दिसणार आहे. नुकताच  पहिला टिझर प्रदर्शित  झाला. प्रेक्षकांना याची झलक पाहायला मिळालेली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

आता हाडं मोडायची नाहीत जोडायची... "डॉक्टर डॉन" नवीन मालिका 12 फेब्रुवारीपासून, सोम - शनि रात्री 9 वा फक्त #ZeeYuva वर. #DoctorDon @devdatta.g.nage @shwetashinde_official

A post shared by Zee Yuva (@zeeyuva) on

देवदत्त नागे एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे, त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात त्याच्या पुनरागमनाविषयी असलेली उत्सुकता अधिक वाढलेली आहे. प्रोमोमध्ये देवदत्त नागे एका गुंडाच्या मागे धावताना दिसतो आहे. त्याच्या हातात एक पिस्तुल आहे. त्याच्या हातातील पिस्तुल अचानक अदृश्य होते व त्या जागी स्टेथस्कोप दिसू लागतो. त्याचप्रमाणे त्याच्या अंगावरील कोट पांढऱ्या लॅबकोटमध्ये परावर्तित होतो, असे या प्रोमोमध्ये दिसते.

 देवदत्तने जपलेल्या पोनीटेलमुळे, त्याचा लुक एकदमच झकास दिसतोय! हा डॉक्टर डॉन कशाप्रकारे हास्यउपचार आणि विनोदाचे फायरिंग करतो, ते पाहण्याची उत्सुकता आता सर्वांना लागून राहिलेली आहे.