'स्त्रीया दोन नवरे हवेत असं म्हणतील तेव्हा...', अरमान मलिकच्या 'प्रत्येक पुरुषाला दोन पत्नी हव्या' वक्तव्यावर संतापली अभिनेत्री

Devoleena Bhattacharjee Gets Angry on Armaan Malik : अरमान मलिकलच्या 'प्रत्येक पुरुषाला दोन पत्नी हव्या' वक्तव्यावर देवोलीना भटाचार्जीची संतप्त प्रतिक्रिया...

दिक्षा पाटील | Updated: Jun 27, 2024, 04:21 PM IST
'स्त्रीया दोन नवरे हवेत असं म्हणतील तेव्हा...', अरमान मलिकच्या 'प्रत्येक पुरुषाला दोन पत्नी हव्या' वक्तव्यावर संतापली अभिनेत्री title=
(Photo Credit : Social Media)

Devoleena Bhattacharjee Gets Angry on Armaan Malik : लोकप्रिय युट्यूबर्सपैकी एक अरमान मलिक हा 'बिग बॉस ओटीटी 3' शोचा स्पर्धक आहे. पण फरक इतकाच आहे की शोमध्ये आल्यापासून तो चांगला कारणांमुळे नाही तर चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आहे. 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये अरमान मलिक हा त्याच्या दोन्ही पत्नीसोबत म्हणजेच पायल आणि क्रितीकासोबत दिसत आहे. देवोलीना भट्टाचार्जीनं अरमानला त्याच्या दोन्ही पत्नींवरून अनेक गोष्टी सुनावल्या आहेत आणि आता पुन्हा एकदा तिनं त्या तिघांवर मोठं वक्तव्य केलं आहे. 

अरमानचं मोठं वक्तव्य

दीपक चौरसियाशी बोलत असताना अरमान मलिकनं सांगितलं की 'प्रत्येक पुरुषाला दोन पत्नी हव्या असतात.' आता त्याच्या या वक्तव्यानं पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष वेधले. तर एपिसोडचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत देवोलीनानं एक मोठी पोस्ट लिहिली आहे. व्हिडीओमध्ये ती हे बोलताना दिसतेय की 'हा माणूस काय बोलतोय.' तिच्या पोस्टमध्ये देवोलिना बोलते की 'प्रत्येक माणसाला दोन बायका नको, फक्त ज्या लोकांची वाईट वृत्ती असते त्यांना एकापेक्षा जास्त पत्नी हव्या असतात. हे बंद कर. एखाद्या दिवशी जर त्याच पत्नी बोलू लागल्या की त्यांना देखील प्रत्येकीला दोन नवरे हवे आहेत. मग ते बघायला देखील तयार रहा.' 

स्त्रीया बोलतील दोन नवरे हवेत! 

पुढे देवोलिनानं हे देखील सांगितलं की 'हे सगळं त्याच्यावर परत येईल आणि तो दिवस लांब नाही जेव्हा महिला देखील एकापेक्षा जास्त पती ठेवण्याची इच्छा व्यक्त करतील. त्यांनी हे देखील सांगितलं की ती त्या दिवसाची प्रतीक्षा करेल आणि त्यावेळी बघेन की जे लोक अरमानला पाठिंबा देत आहेत ते त्या महिलांना पाठिंबा देत आहेत का ज्यांना दोन नवरे हवे आहेत. त्यांनी हे देखील सांगितलं की समाज आधीपासून विनाशाच्या मार्गावर आहे. ज्या गोष्टी वर्षों-वर्ष सुरु आहेत. त्या पुढेही व्हायला हव्या असं नाही. याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर त्याचा अर्थ हा आहे की आपण या सगळ्याला पाठिंबा देतो. माझ्या नजरेत हे चुकीचं आहे. POLYGAMY IS WRONG आणि हे नेहमीच चुकीचं राहिल. पण काय करायचं, जोपर्यंत आपण स्वत: त्या गोष्टीचा सामना करत नाही तोपर्यंत कळत नाही. तर ऑल द बेस्ट.'

हेही वाचा : सोनाक्षी सिन्हानं 2 वर्षांपूर्वीच गुपचूप केला होता साखरपुडा! आता 'तो' फोटो होतोय VIRAL

अरमानच्या लग्नाविषयी बोलायचं झालं तर त्याची दोन्ही लग्न ही त्याच्या पत्नींना भेटल्याच्या सात दिवसात झाली आहे. त्यावरुन देखील अरमानला त्याच्या दोन्ही लग्नांवरून वाईट म्हटलं आणि त्याला खूप ट्रोल केलं.