'धडक'चे नवे पोस्टर रिलीज

बॉलीवूडचे हे वर्ष कदाचित नव्या चेहऱ्यांसाठी खास असणार आहे. यंदाच्या वर्षात जान्हवी कपूर, सारा अली खान, तारा सुतारिया आणि अन्यना पांडे पदार्पण करतायत. 

Updated: Jun 8, 2018, 04:53 PM IST
'धडक'चे नवे पोस्टर रिलीज

मुंबई : बॉलीवूडचे हे वर्ष कदाचित नव्या चेहऱ्यांसाठी खास असणार आहे. यंदाच्या वर्षात जान्हवी कपूर, सारा अली खान, तारा सुतारिया आणि अन्यना पांडे पदार्पण करतायत. या चौघांच्या पदार्पणाच्या सिनेमांबाबत साऱ्यांनाच उत्सुकता आहे. विशेष म्हणजे, जान्हवी, सारा, आणि अन्यना हे स्टार किड मोठ्या पडद्यावर पदार्पणासाठी सज्ज झालाय. यादरम्यान, जान्हवीचा पहिला सिनेमा धडक लवकरच रिलीज होणार आहे आणि नुकतेच या सिनेमाचे नवे पोस्टर करण जोहरने रिलीज केलेय.

सिनेमाच्या या पोस्टरमध्ये जान्हवी आणि इशान यांची केमिस्ट्री दिसतेय. या सिनेमाची कहाणी सैराट या मराठी सिनेमाच्या कहाणीवर आधारित आहे. हा सैराटचा अधिकृत रिमेक आहे. सिनेमाच्या पोस्टरमध्ये इशान जान्हवीच्या चेहऱ्यावर रंग लावताना दिसतोय. हे पोस्टर शेअर करताना करण जोहर म्हणाला, या सिनेमाचा ट्रेलर लवकरच रिलीज होणार आहे आणि हा सिनेमा २० जुलैला रिलीज होणार आहे. 

 

#DHADAK #momemtsofdhadak trailer releasing shortly!!! @janhvikapoor @ishaan95 @shashankkhaitan

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

या सिनेमाचे दिग्दर्शन शशांक खेतानने केलंय. तर जान्हवी आणि इशान मुख्य भूमिकेत आहे. जान्हवी आपल्या या आगामी सिनेमाबाबत खूप उत्सुक आहे. लवकरच या सिनेमाचे प्रमोशन सुरु करणार आहे.