'धडक' सिनेमाचे नवे पोस्टर रिलीज

बॉलीवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरचा डेब्यू असलेल्या धडक या सिनेमाचे पोस्टर लाँच झालेय. या सिनेमात तिची इशानसोबत चांगली केमिस्ट्री दिसतेय. 

Updated: Jun 15, 2018, 06:26 PM IST
'धडक' सिनेमाचे नवे पोस्टर रिलीज

मुंबई : बॉलीवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरचा डेब्यू असलेल्या धडक या सिनेमाचे पोस्टर लाँच झालेय. या सिनेमात तिची इशानसोबत चांगली केमिस्ट्री दिसतेय. रिलीज होण्याआधीच या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. आता ट्रेलरच्या रिलीजनंतर आणखी एक पोस्टर रिलीज झालेय.  मध्यमवर्गीय मुलाला एका खानदानी मुलीशी प्रेम होते आणि त्यानंतर प्रेमासाठी त्यांची समाजाविरुद्ध लढाई. असंच काहीसं या नव्या पोस्टरमध्ये दाखवलंय. यात दोघेही घाबरल्यासारखे दिसतायत. इशान घाबरलेला आहे आणि जान्हवी त्याला धीर देण्याचा प्रयत्न करतेय. ज्या नजाकतीने जान्हवी आणि इशानने भूमिका साकारलीये त्यासाठी सगळेचजण त्यांचे कौतुक करतायत. 

 

A LOVE STORY....deep unconditional first LOVE! 20th of July let the love explode! #dhadak @ishaan95 @janhvikapoor @shashankkhaitan

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

जान्हवी आणि इशाच्या जोडीची चर्चा सुरुवातीपासूनच होती. पोस्टरमध्ये दोघांचीही चांगली केमिस्ट्री दिसतेय. जान्हवी कपूरने या सिनेमासाठी खूप मेहनत घेतलीये. धडक सिनेमा पुढील महिन्यात २० जुलैला रिलीज होतोय. हा सिनेमा मेवाडी बॅकग्राऊंडवर आधारित आहेत. २०१६मध्ये आलेल्या मराठीतील ब्लॉकबस्टर सिनेमा सैराटचा हा हिंदी रिमेक आहे.